आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक नोकरीचे आमिष; दहा लाखांना फसवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिक्षकाची नोकरी लावतो म्हणून दहा लाख रुपये घेऊन एका तरुणाची फसवणूक केली. नंतर शाळेच्या मस्टरवर सही घेतली नाही, नियुक्ती देता फसवणूक केल्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल झाला अाहे. ही घटना २००९ पासून नेहरूनगर येथील मागास समाज सेवा मंडळाच्या संस्थेत घडली अाहे.

महादेव बिराजदार (रा. जय जलारामनगर, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली अाहे. संस्थेचे अध्यक्ष चंद्राम चव्हाण, सहसचिव मोहन चव्हाण, सचिन सुभाष चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. बिराजदार यांचा मुलगा सिध्दरामेश्वर यांना संस्थेत शिक्षकाची नोकरी लावतो म्हणून दहा लाख रुपये घेतले. न्यू हायस्कूल सलगरवाडी येथे नोकरी दिली. मस्टरवर सह्या घेतल्या नाहीत. पगारही दिला नाही. नियुक्ती पत्रही दिले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले अाहे. पोलिस निरीक्षक फुगे तपास करीत अाहेत.

बदनाम करण्याचा प्रयत्न
सर्वसामान्यमुलांना शिक्षण मिळावे यासाठी संस्थेची स्थापना केली. ६० वर्षांपासून ही संस्था सुरू अाहे. अनेकांनी अामच्या कार्याची दखल घेऊन गौरविले अाहे. बिराजदार यांनी मला नाहक त्रास देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न करीत अाहेत. अामच्याकडून काहीच गैरमार्गाचा अवलंब झाला नाही, अशी बाजू निवेदनाद्वारे संस्थेचे अध्यक्ष चंद्राम चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिले अाहे.
बातम्या आणखी आहेत...