आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल १०० काेटी खर्चून दौंडला रेल्वेचे लोकोशेड, विजेवर धावणाऱ्या २०० इंजिन दुरुस्तीची क्षमता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वेच्या विद्युत इंजिनची अत्याधुनिक पद्धतीने देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी दाैंड (जि. पुणे) येथे लाेकाेशेड उभारण्यास रेल्वे बाेर्डाने मंजुरी दिली अाहे. भारतीय रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीकडून गेल्या काही महिन्यांपासून त्याचे काम सुरू अाहे. सुमारे शंभर काेटी खर्च करून दौंड रेल्वेस्थानकाजवळील सुमारे १० ते १२ हेक्टर जागेत हे काम हाेत असलेला हा लाेकाेशेड सोलापूर विभागातील पहिला, तर देशातील २४ व्या क्रमांकाचा असेल. मध्य रेल्वेने यापूर्वी देशात तीन लाेकाेशेड उभारले अाहेत.

रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम देशात वेगाने सुरू आहे. सध्या पुणे ते गुंटकल व्हाया सोलापूर, दौंड -बारामती, दौंड -मनमाड, पुणे -मिरज -कोल्हापूर आदी मार्गावर हे काम सुरू आहे तर काही ठिकाणी लवकरच सुरू हाेत अाहे. हे काम झाल्यावर विद्युत इंजिनची संख्या निश्चितच वाढेल. विजेवर धावणाऱ्या या इंजिनच्या दुरुस्तीसाठी साेयीस्कर जागा मिळावी म्हणून मध्य रेल्वेने लाेकाेशेडसाठी दाैंडची निवड केली अाहे. या ठिकाणी सहाशे ते एक हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. सुमारे एक ते दीड वर्षात हा शेड उभारला जाईल, अशी माहिती साेलापूर रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता व्ही. के. सिंग यांनी दिली.

इंजिन दुरुस्तीचे वेळापत्रक : प्राथमिक स्वरूपात तीन टप्प्यांवर इंजिन दुरुस्ती होते. शेडमधून इंजिन बाहेर पडल्यानंतर ९० दिवसांनी पहिला टप्पा, १८० दिवसानंतर दुसरा तर २७० दिवसांनंतर तिसऱ्यांदा दुरुस्ती होते. तसेच ४५ दिवसांनंतर ट्रिप इन्स्पेक्शन होते. इंटरमिडीएट ओव्हर हॉलिंग प्रकारात साडेपाच ते साडेसहा वर्षे झालेल्या किंवा १२ लाख किमी धावलेल्या इंजिनची दुुरुस्ती होते. तर पीओएच पिरॉडोकली ओव्हर हॉलिंग प्रकारात बारा ते साडेबारा वर्षे झालेल्या अथवा २४ लाख किमी धावल्यावर दुरुस्ती होते. साधारणपणे एका इंजिनचे आयुर्मान ३४ वर्षे, वजन १२३ टन तर किंमत १० ते १२ कोटी रुपये असते.

लोकोशेडची वैशिष्ट्ये
सुमारे २०० इंजिन दुरुस्तीची क्षमता या लाेकाेशेडची अाहे. डब्ल्यूएजी ७ व ९ या शक्तिशाली प्रकारातल्या इंजिनची दुरुस्ती इथे हाेईल. त्यासाठी व्हीव्हीव्हीएफ (व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ) या प्रगत तंत्र ज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे कमीत कमी ऊर्जेवर चांगल्या पद्धतीने इंजिन दुरुस्ती केली जाते. या शेडमध्ये केवळ ३ फ्रेज इंजिनाचीच दुरुस्ती होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...