आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पकडलेली मोकाट जनावरे आता परत नाही, महापालिकेने 100 मोकाट जनावरे पाठवली गोशाळेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेने मोकाट जनावरे पकडून न्यायची आणि जनावर मालकांनी ती परत आणून रस्त्यावर चरायला सोडायची, असे आता चालणार नाही. पकडलेली जनावरे आता परत द्यायची नाहीत, असे महापालिकेने ठरवले आहे. उलट जनावरे परत मागण्यास येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
 
शहरातील मोकाट जनावरे पकडून गोशाळेत नेण्याची मोहीम महापालिकेने मागील पाच दिवसांपासून सुरू केले आहे. आतापर्यंत सुमारे १०० मोकाट जनावरे गोशाळेत दाखल करण्यात आली आहेत. ही मोहीम कायमस्वरूपी सुरू करून तडीस नेण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. 
 
शहरात मोकाट जनावरांची संख्या वारंवार वाढत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. याबाबत महापालिकेच्या वतीने जुजबी कारवाई करण्यात येत होती. ठोस कारवाईसाठी महापालिका आयुक्ता डाॅ. ढाकणे यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी स्वत: जाहीर प्रसिद्धीकरण करून मुदत दिली. त्यानंतर महापालिका गुरेवाहकविभागाच्यावतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे.
 
रोज सुमारे आठ ते दहा मोकाट जनावरे पकडून शहरातील गोशाळेत दाखल करण्यात येत आहेत. मनपाकडे दोन गुरेवाहक वाहने आहेत. त्यापैकी एक वाहन नादुरुस्त आहे. ते दुरुस्त करून दोन्ही वाहनांच्या मदतीने मोकाट जनावरे नेण्यात येणार आहेत.
 
सात गोशाळांचे सहकार्य 
शहरातसात गोशाळा आहेत. त्यांच्याकडे सुमारे १०० गायी पालनसाठी देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या कोंडवाड्यात जागा अपुरी असून, तेथे चाऱ्याची सोयही नाही. त्यामुळे गायी गोशाळेत सोडण्यात येत आहेत. गोशाळेत सोडलेल्या गायी परत आणता तेथेच पालन करण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...