आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वी, 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी दहावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. काही हरकती असल्यास लेखी स्वरूपात मंडळाकडे २५ दिवसांच्या आत पाठवाव्यात. बारावी परीक्षा बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०१८ ते मंगळवार, दि. २० मार्च २०१८ पर्यंत असतील. तर दहावी परीक्षा गुरुवार, दि. मार्च ते २४ मार्च २०१८ या कालावधीमध्ये होतील. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

अन्य संकेतस्थळावरून अथवा सोशल मीडियावरून व्हायरल वेळापत्रक ग्राह्य धरू नये. 

बातम्या आणखी आहेत...