आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1100 दुचाकी वाहने केली जप्त; मात्र रिक्षांकडे होतेय दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वाहतूकपोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी मोहीम राबवून सुमारे ११०० दुचाकी वाहने जप्त केली. या वाहनांनी पोलिस कल्याण केंद्र भरून गेले अाहे. कागदपत्रे, पीयूसी, इन्शुरन्स, वाहन परवाना, फॅन्सी नंबर प्लेट अादी कारणांमुळे ही वाहने जप्त करून वाहनधारकांना अारटीअोचे मेमो देण्यात येते. आरटीओत गेल्यानंतर तीन-चार हजार रुपये दंडाचा फटका बसतो. यामुळे वाहनचालक वाहने सोडवून घेण्यास कचरत अाहेत. जप्त केलेल्या वाहनांची संख्या मात्र वाढताना दिसत आहे. 
 
मागील अाठ दिवसांपासून ही कारवाई सुरू अाहे. वाहन सोडवून घेण्यात कागदपत्रांची पैशाची अडचण येत असल्यामुळे अनेकांकडून वाहने सोडवून घेण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे वाहने थांबून अाहेत. अारटीअोत जा ये करण्यात जास्त वेळ जात आहे. अारटीअो अधिकारीच पोलिस कल्याण केंद्रात अाले अन् कागदपत्रांची पाहणी करून दंडात्मक कारवाई केली तर वाहनांचा निपटारा लवकर होऊ शकतो. पण, तसे नियोजन पोलिसांकडून होताना दिसत नाही. 
 
बिगर पासिंग, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, ड्रेसकोड, बॅच बिल्ला लावणाऱ्या रिक्षांवर सक्षमपणे कारवाई होताना दिसत नाही. होटगी रोड विजापूर रोडवर अशी स्थिती पाहायला मिळते. नो पार्किंग झोन, वन-वे, चुकीच्या दिशेने ये-जा करणे अशा वाहनांवर कारवाई होणे अपेक्षित अाहे. शिवाजी चौक रेल्वे स्टेशन भागात बेशिस्त रिक्षा थांबतात. त्या ठिकाणी कारवाई मोहीम राबवली जात नाही. रिक्षांनाही जॅमर लावून कारवाई मोहीम राबवल्याशिवाय शिस्त येणार नाही. क्रेनद्वारे होणारी कारवाई मोहीम शहरातील ठरावीक ठिकाणीच होते. 
 
अारटीओ म्हणतात, शिस्त महत्त्वाची 
वाहतूकपोलिस निरीक्षक कुमार अागलावे यांना बाजू विचारण्यासाठी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खारमाटे यांना विचारले असता, नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत, शिस्त महत्त्वाची अाहे. अारटीअो कार्यालयात दंड भरण्यासाठी अाल्यानंतर अाम्ही वाढीव अधिकारी देऊन नियोजन केले अाहे. मार्च एण्डमुळे कारवाई होत आहे, असा नागरिकांचा समज अाहे. पण तो चुकीचा अाहे. दंडाचे टार्गेट ठेवून पोलिसांना काम करता येत नाही. वाहतूक शिस्त महत्त्वाची असते. 
बातम्या आणखी आहेत...