आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुद्रा'चा माढा शहरातील १११ नवउद्योजकांना लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माढा - ग्रामीण भागातील कारागीर इतर छोट्या व्यावसायिकांना उद्योग व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी प्रोत्साहन देणारी मुद्रा योजना जिल्ह्यातील होतकरू व्यावसायिकांसाठी लाभदायी ठरत आहे. ५० हजारांपासून ते लाखांपर्यंत तीन श्रेणीत कर्जाचा पुरवठा करणारी मुद्रा (मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफाइनेन्स एजन्सी) या योजनेची अंमलबजावणी सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सुरू आहे. या योजनेंतर्गत तीन विविध राष्ट्रीयीकृत बँकांनी माढा शहरातील १११ नवउद्योजकांना कर्जाचे वाटप केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मेक इन इंडिया'अंतर्गत स्थानिक पारंपरिक व्यवसायाच्या प्रोत्साहनासाठी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुक्ष्म लघु कर्जपुरवठा करण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत सलून, ब्युटीपार्लर, लोहारकाम, शिवणकाम, सुतारकाम, भाजीपाला विक्री केंद्र, लाँड्री, कृषी प्रक्रिया, पशुखाद्य निर्मिती, बेकरी, कॅन्टीन, डेअरी, रिक्षा वाहतूक, हस्तकला, एम्ब्राॅयडरी आदी छोट्या- मोठ्या व्यावसायिकांना बँकेद्वारे कर्जाचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सर्व राष्ट्रीयीकृत बँकेत सुरू आहे. व्यवसायाच्या प्रस्तावानुसार मिळणाऱ्या विनातारण कर्जामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा आधार मिळाला.

माढा शहरात प्रतिसाद : भारतीय स्टेट बँक २५, युनियन बँक ऑफ इंडिया २५, बँक ऑफ इंडिया ६१ अशा तीन राष्ट्रीयीकृत बँकेत एकूण १११ नवउद्योजकांना मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले आहे.

5 ते 7 वर्षांची मुदत : मुद्राअंतर्गत व्यावसायिकांना शिशू, किशोर तरुण या तीन प्रकारांत प्रस्तावानुसार विनातारण पाच ते सात वर्षांच्या मध्यम मुदतीसाठी कर्जपुरवठा करण्यात येत आहे. यात शिशूसाठी ५० हजार, मुदतीच्या आत कर्जाची व्यवस्थित फेड केल्यास किशोर अंतर्गत ५० हजार ते लाख रुपये तरुण या श्रेणीत ते १० लाखांपर्यंत कर्जाची उपलब्धता आहे. शिशू कर्जामुळे तरुण, महिलांना गृहउद्योग, व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळू शकते.

विनातारण कर्ज
ग्रामीणभागातील पारंपरिक व्यावसायिक लघुउद्योजकांच्या प्रोत्साहनासाठी मुद्रा योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. बँकेमध्ये आलेल्या व्यवसायाच्या प्रस्तावानुसार बँकेतील पतनुसार पडताळणी करून समोरच्या व्यक्तीस विनातारण कर्ज दिले जात आहे.

त्वरित कर्ज
नवउद्योजक बँकेत कागदपत्रे सादर करण्याकरता येत आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास मी त्वरित कर्ज मंजूर करत आहे. नवउद्योजकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा. रवींद्र आहेर वाडीकर, व्यवस्थापक,भारतीय स्टेट बँक, माढा

सुलभ कर्ज प्रकिया
गरजू व्यक्तींना तातडीने कर्ज मिळावे, हा उद्देश मुद्रा योजनेमागे आहे. त्याचा नवउद्योजकांना फायदाही होत आहे. कर्जासाठी फक्त आधारकार्ड, कोटेशन, १०० रुपयांचा मुद्रांक एवढीच कागदपत्रे लागत असल्याने सोयीचे झाले आहे.” बापू जाधव, नव उद्योजक,वेताळवाडी
बातम्या आणखी आहेत...