आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेश, तिसरी यादी जाहीर; आज शेवटची मुदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी नाेटीस बोर्डावर घोषित झाली. प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने बुधवारी (दि. १२) सायंकाळी पाच वाजता शहरातील प्राचार्यांची विशेष बैठक संगमेश्वर महाविद्यालयात आयोजिली आहे.
 
या बैठकीत फक्त शहरातील महाविद्यालयांच्या प्रााचार्यांनी उपस्थित राहावे, असे अावाहन माध्यमिक शिक्षण सहायक सूर्यकांत सुतार यांनी केले आहे. तिसऱ्या यादीनंतरही जर महाविद्यालयांमध्ये अकरावी सायन्स जागा रिक्त राहत असतील तर या जागा माध्यमिक शिक्षण विभागातर्फे भरण्यात येणार आहेत.
 
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ९२, ९१ टक्क्यांवर बंद झाली होती. दुसरी गुणवत्ता यादी चार ते पाच टक्क्यांनी उतरली तर तिसरी यादी आणखी तीन टक्क्यांनी उतरली. मात्र तरीही संगमेश्वर ८७ टक्के, वालचंद ८५ टक्के दयानंद ७० टक्के अशी कट ऑफ लिस्ट लागली.
 
बुधवारी प्राचार्यांची बैठक
अकरावी सायन्स शाखेतील रिक्त जागांची माहिती बुधवारी प्राचार्यांच्या बैठकीत घेण्यात येईल. या रिक्त जागा गुणवत्तेनुसार भरण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग प्रवेश प्रक्रिया राबविणार आहे. मात्र ही प्रक्रिया फक्त शहरातील महाविद्यालयांपुरती असेल. उर्वरित जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील रिक्त जागांवर पाल्यांनी संपर्क साधून प्रवेश घ्यावा.”
- सूर्यकांत सुतार, शिक्षण सहायक, माध्यमिक विभाग
 
बातम्या आणखी आहेत...