आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे ओढा, महाविद्यालयात अर्ज खरेदी करण्यासाठी गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाची प्रकिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी गुरुवारी शहरातील नामवंत महाविद्यालयात विद्यार्थी, पालक यांनी अर्ज खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.
विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त असल्याने शहरातील नामवंत महाविद्यालयातून एकाच दिवशी पाच हजारांहून अधिक अर्जांची विक्री झाली आहे. कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वरचेवर कमी होताना दिसत आहे.

प्रवेश पूर्व अर्ज विक्री करण्यास सुरुवात झाली. महाविद्यालयांनी सकाळी ११ ते या वेळेत अर्ज विक्री केली. प्रवेशपूर्व अर्ज विक्री करण्याचा पहिलाच दिवस असला तरी पालक विद्यार्थ्यांनी अर्ज घेण्यासाठी गर्दी केली होती. विद्यार्थी पालक यांचा ओढा देखील सायन्सकडे आहे. पूर्वी साधारणपणे हुशार असलेल्या विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे ओढा होता. आता ६० टक्के पडलेल्या विद्यार्थ्यांचा कलदेखील विज्ञान शाखेकडे अाहे. कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी असल्यामुळे महाविद्यालये येईल त्याला प्रवेश देण्याच्या तयारीत आहेत.

१८ तारखेपर्यंत अर्ज विक्री केली जाईल. त्यानंतर अर्ज महाविद्यालयात सादर करण्यासाठी १५ ते १८ जूनचा कालावधी देण्यात आला आहे. काही पालक सर्व कागदपत्रे बरोबर आणले असल्याने अर्ज भरून जमा करत असल्याचे दिसून आले. अर्ज विक्री स्वीकृती नंतर १९ ते २२ जून दरम्यान अर्जांची छाननी होईल. त्यानंतर पहिली गुणवत्ता यादी २३ जून रोजी जाहीर हाेऊन प्रवेश दिले जातील. दुसरी यादी २८ जूनला लागेल. प्रवेश रिक्त राहिले तरच तिसरी गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल.

गुणवत्तेनुसार प्रवेश
^विद्यार्थ्यांनी नामवंत महाविद्यालयाचा अाग्रह धरू नये. सर्व प्रवेश गुणवत्तेनुसार होतील. अर्जाचे शुल्कदेखील ठरवून दिले आहे.” एस. सुतार, उपशिक्षणाधिकारी,माध्यमिक विभाग
पुढे अवघड परीक्षा

^पालकांना मुलगा इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावा, अशी अपेक्षा असते. बारावीनंतर अनेक अवघड परीक्षांना सामोरे जावे लागते. याची जाण हवी.” एस. के. वडकबाळकर, प्राचार्य,दयानंद महाविद्यालय
बातम्या आणखी आहेत...