आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपच्या संपर्कात, पालकमंत्री देशमुख यांनी केला दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - काँग्रेसचे विद्यमान १२ नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. योग्यवेळी त्यांना पक्षात घेऊ. मनपा निवडणुकीत तिकीट देताना भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, म्हणून आम्ही त्या नगरसेवकांना थांबवले आहे. महापालिका निवडणूक महायुती करून आम्ही लढू, अशी घोषणा पालकमंत्री तथा भाजपचे नेते विजयकुमार देशमुख यांनी केली. उजनीच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसफुटीचा दावा केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना यांच्यात युती नक्की होईल, अशी खात्री पालकमंत्री देशमुख यांनी दिली. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख खासदार राहुल शेवाळे यांच्याशी मुंबईत झालेल्या भेटीचा संदर्भही दिला. दिवाळीनंतर बसून निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. शिवसेना यासह रिपाइं, रासप यांना महायुतीत घेऊन निवडणूक लढू, असे देशमुख म्हणाले.

यावेळी जागा वाटप फार्म्युला बदलेल
यापूर्वी महापालिका निवडणुकीत शिवसेना ४३ तर भाजप ५९ या पद्धतीने जागा वाटप झाले होते. त्यानुसार शिवसेना जागेची मागणी करणार असल्याची चर्चा आहे. पण भाजप मात्र जास्त जागांची मागणी करणार आहे. पालकमंत्री देशमुख म्हणाले, शहरात दोन भाजपचे आमदार खासदार अशी पदे अाहेत. त्यामुळे भाजपला अधिक झुकते माफ नैसर्गिक न्यायतत्वाने मिळेल. त्यासाठी नवीन फाॅर्म्युल्याची मागणी अाम्ही करू.

प्रभाग रचनेवर हस्तक्षेप नाही
प्रभाग रचनेत सत्ताधाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. त्यावर पालकमंत्री म्हणाले, ‘निवडणूक आयोगाचे ते काम आहे. आम्ही प्रभाग रचनेवर हस्तक्षेप केला नाही. यापूर्वी कधी आम्ही तसे केले नाही. प्रभाग रचनेच्या गणितापेक्षा अामचा जनतेवर विश्वास अाहे, तेच ठरवतील पालिकेचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा.’ यावेळी मनपा विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, नगरसेवक सुरेश पाटील, अविनाश पाटील उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...