आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच सरस, जिल्ह्यात मोहोळचा झेंडा जिल्ह्याचा एकूण निकाल 91.32 टक्के

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बारावी परीक्षेचा सोलापूर जिल्ह्याचा एकूण निकाल ९१.३२ टक्के इतका लागला. १०० टक्के यश पटकावणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या तब्बल १०१ पर्यंत गेली. एकूण ४८ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिली होती. यात २९ हजार २५९ मुले होते १९ हजार ६५० मुली होत्या. उत्तीर्ण प्रमाणाची टक्केवारी काढली तर मुलींनी यंदाही बाजी मारल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्याचा मागील तीन वर्षांचा निकाल पाहिला तर यंदाची टक्केवारी मध्यम आहे. २०१५ मध्ये ९३.०६ तर २०१६ मध्ये ८७.४८ टक्के निकाल लागला होता. यंदा या निकालात वाढ होऊन ती ९१.३२ टक्के इतका झाला आहे. 

जिल्ह्यातून ४८ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, शास्त्र तंत्रशिक्षण विभागातून परीक्षा अर्ज भरला होता. त्यापैकी ४८ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षेस हजेरी लावली. परंतु यंदा ४८ हजार ९८७ विद्यार्थ्यांपैकी हजार ३२४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. सगळ्यात कमी निकाल कला शाखेचा लागला असून, त्या खालोखाल निकाल तंत्रशिक्षण विभागाचा लागला आहे. 

जिल्ह्याचा निकाल 
मुले ८८.७० % 
मुली ९५.२२ % 
एकूण ९१.३२ % 
बातम्या आणखी आहेत...