आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात १३ रस्ते राष्ट्रीय महामार्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रस्तेवाहतूक महामार्ग विभागातर्फे नुकताच राज्यातील २६ रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील १३ रस्त्यांचा त्यात समावेश आहे. या रस्त्यांचा प्रारूप विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चौपदरी झालेल्या रस्त्यावरून टोल वसुलीची शक्यता आहे.
मध्यंतरी देशातील ५० हजार किमी राज्य मार्ग विकसित करून त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. त्यानुसार हे रस्ते उत्तम दर्जाचे होतील आणि दळण वळणास चांगले होतील. रस्त्यावरील वाहतूक पाहून या रस्त्यांची रुंदी निश्चित केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील या १३ राष्ट्रीय महामार्गांना नव्याने मंजुरी देण्यात आली आहे. यातील काही रस्त्यांचे डीपीआर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. तर काहींच्या डीपीआर करण्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे.

रस्त्यावरील वाहतूक क्षमता लक्षात आल्यांतर दुपदरी, चौपदरी किंवा सहा पदरी करायचे निश्चित होईल. चौपदरी करायचे असेल तर ते बीओटी तत्त्वावर करावे लागणार आहे. तसे झाल्यास तेथे टोल वसुली होईल. यासाठी भूसंपादनही होणार आहेत. ग्रामीण, शहर हद्द आणि रस्ता किती पदरी यावर रुंदी ठरेल. ग्रामीण भागात रस्ता सहा पदरी असेल तर मध्यापासून दोन्ही बाजूस ७५ मीटर जागा सोडावी लागते.

टेंभुर्णी- पंढरपूर- मंंगळवेढा- मरवडे- उंबडी- विजापूर
सातारा- मुरवड- पिलीव- पंढरपूर
नगर- मिरजगाव- करमाळा- टेंभुर्णी
कुर्डुवाडी- बार्शी- येडशी- मुरूड- लातूर
सातारा- कोरेगाव- म्हसवड- माळशिरस- अकलूज- टेंभुर्णी
टाकळी- कोर्सेगाव- तडवळ- अक्कलकोट- शिरवळ- वागदरी- अलूर- मुरुम
तुळजापूर- नळदुर्ग- अक्कलकोट
मुरवल- अलर- अक्कलकोट- इंडी- विजापूर
धारूर- केज- कळंब- बार्शी- कुर्डुवाडी- पंढरपूर- सांगोला
मोहोळ- कुरुल- कामती- वरुणनगर- आमगाव- तांदूळवाडी
सांगोला- महूद- तांदूळवाडी- वेळापूर

^सोलापूर जिल्ह्यातूनजाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचा प्रारूप तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो होताच पुढील प्रक्रिया सुरू करून रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून अकरा राष्ट्रीय महामार्ग जात आहेत.” अशोकभोसले, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय
बातम्या आणखी आहेत...