आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळेत १३ वर्षीय शाळकरी मुलीची गळफासाने आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - बाळेतील खंडोबा मंदिर परिसरात राहणा-या तेरा वर्षीय सुकन्या बसवराज साखरे (वय १३) या शाळकरी मुलीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीला आला. घटनेचे कारण स्पष्ट झाले नाही. दाराच्या कडीला गळफास लावून घेतल्यामुळे संशय बळावला. कोंडीला गळफास कसा काय बसू शकतो, हा प्रश्न समोर येतोय.

सुकन्याचे वडील कोंडी शिवारात एक हॉटेलात वस्ताद आहेत. आई अपंग असून त्याही दुस-यांकडे धुणीभांडी करतात. भाऊ बारावी पास आहे. आई, वडील दोघेही कामाला गेले होते. भाऊ बाहेर गेला होता. सुकन्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीत शिकत होती. शाळेचा ड्रेस तनिे घातला होता, ड्रेसवरील ओढणीने गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. हा प्रकार शेजाऱ्यांना कळताच नागरिकांनी धाव घेतली. प्रकाश सूर्यवंशी या शेजाऱ्याने गळफास सोडवून शासकीय रुग्णालयात आणले. परंतु दाखल करून घेण्यापूर्वीच ती मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. फौजदार चावडी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर काही वेळाने त्यांनी घरी येऊन पंचनामा केला आणि शवविच्छेदनाकरता हलवले.

वडिलांनादु:ख अनावर : शासकीय रुग्णालयात वडील बसवराज यांना दु:ख अनावर झाले होते. ते पहाटे साडेचारला कामावर गेले होते. त्यावेळी सुषमा घरी झोपली होती. त्यामुळे दोघांचे बोलणेही सोमवारी झाले होते. मंगळवारी थेट मृतदेह पाहण्यास मिळाला. भाऊ, आई यांचेही दु:ख पाहावत नव्हते. अभ्यासाचा ताण की अन्य घरगुती कारण हे मात्र अद्याप समोर आले नाही.