आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेलापूरमध्ये रेल्वेतून 14 किलो सोने जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कुर्ला-विशाखापट्टणम एक्स्प्रेसच्या प्रथम दर्जाच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तींकडे सुमारे १४ किलो सोने आढळून आले. सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले असता ते मुंबईतील सोन्याचे व्यापारी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी पुढील कारवाईसाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले असून लोहमार्ग पोलिस ठाण्यात आयकर विभागाकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
 
बाजारभावाप्रमाणे याची किंमत साडेचार कोटी रुपये आहे. चिल्केश चंद्रकांत जैन व व जयेश शांतीलाल जैन अशी या दोघांची नावे असून मुंबईतील सोन्याचे व्यापारी असल्याचे हे तरुण सांगतात. विजयवाडा येथे दागिने घेऊन जात असल्याची माहिती त्यांनी पोलिसांनी दिली. रेल्वे प्रवासात १० हजार रुपयांहून अधिक किमतीची वस्तू नेताना त्याचा विमा उतरवणे व त्याची माहिती वाणिज्य विभागाला देणे बंधनकारक आहे. मात्र, अशी माहिती देण्यात आलेली नव्हती. 
 
बातम्या आणखी आहेत...