आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार्यक्रमासाठी उन्हात बसवल्याने 15 विद्यार्थ्यांना आली‘भोवळ’, रायपूरच्या शिवाजी शाळेतील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - येथील शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात आज २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.२० वाजेपर्यंत संविधान दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या शाळेत कुठल्याही सभागृहाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना उन्हात बसावे लागले. उन्हाचा फटका बसल्याने पाचवी ते नववी मधील १३ मुली मुले अशा १५ विद्यार्थ्यांना भोवळ येणे डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यापैकी अस्वस्थ सहा विद्यार्थ्यांना तातडीने बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. तर नऊ मुलींवर डॉ. काटकर यांच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 

 

रायपूर येथील शिवाजी हायस्कूलमध्ये वर्ग खोल्यांशिवाय कार्यक्रम घेण्यासाठी कुठलेच सभागृह नाही. दरम्यान आज सोमवारी उन्हात कार्यक्रम घेण्यात आला. उन्हामुळे पूनम रमेश सावळे , गीता नारायण सरोदे , पूनम हरिदास सोनुने , कोमल गजानन इंगळे, वैष्णवी संदीप सिरसाट, निकिता सुनील सरकटे , अंकिता सुनील सरकटे, वैष्णवी नरसिंग चिकटे , स्नेहल संजय चिकटे, पूनम उद्धव चिकटे, ऋतुजा संतोष लहाने, हर्षद रमेश घाडगे, विवेक पवन घाडगे, साक्षी दिलीप लहाने पूजा दिलीप सिरसाट या विद्यार्थ्यांना भोवळ येऊन डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्रास असह्य झाल्याने विद्यार्थी रडू लागल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेत धाव घेतली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ यांच्यासह परिचारिका भोसले इंगळे यांनी प्राथमिक उपचार केले. नंतर पालकांच्या सांगण्यानुसार आधी त्रास सुरू झालेल्या नऊ मुलींना बुलडाणा येथील डॉ. दीपक काटकर यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. पुन्हा सहा जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केल्याने विद्यार्थ्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. 

 

विषबाधेची अफवा 

दरम्यान, शाळकरी मुलांना विषबाधा झाल्याची अफवा पसरली होती. पण विषबाधेचा प्रश्नच नाही. तरीही शंका दूर करण्यासाठी स्टिलच्या पाण्याच्या टाकीमधील पाण्याचे नमुने आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी घेतले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...