आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमाणीनगरजवळ मुलाला पळवून नेऊन हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- खासगी शिकवणीवरून घरी जाताना अभय मनोहर सलगर (वय १५, रा. देशमुख पाटीलवस्ती, दमाणीनगर, सोलापूर) याला दुचाकीवरून पळवून नेऊन पाइप, सळईने मारहाण केल्यामुळे सहा जणांवर गुन्हा दाखल झाला अाहे. ही घटना रविवारी रात्री घडली. फौजदार चावडी पोलिसात सलगर याने तक्रार दिली अाहे. 
 
बाळा गायकवाड, विजू डोंगरे, सोमनाथ चव्हाण, अनिल अावरे, राम फंड यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. सलगर हा घरापासून जवळ असलेल्या ठिकाणी ट्यूशनला गेला होता. जानकर मठाजवळ अाल्यानंतर गायकवाड डोंगरे यांनी चापट मारून दुचाकीवरून काही अंतरावर नेऊन तू अामचे सेटिंग का करीत नाही म्हणून पाइपने सळईने सगळ्यांनी मिळून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. जखमींवर उपचार सुरू अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...