आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५१ पोलिसांनी घेतल्या बुलेट गाड्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात दिवाळीनिमित्त फटाक्यांची अातषबाजी सुरू असताना पोलिस अायुक्तालयात बुलेटचा अावाज घुमत होता. १५१ पोलिसांनी एकाच वेळी बुलेट गाड्यांची खरेदी केली. यासाठी बंॅक आॅफ इंडियाने वाहन कर्ज उपलब्ध केले तर चव्हाण मोटार्सने पुढाकार घेतला.
हा अागळा-वेगळा कार्यक्रम सीपी कार्यालयात पार पडला. पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या हस्ते बुलेटची चावी प्रदान करण्यात अाली. यावेळी बँक अाॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक शशिकांत भावसार, उप व्यवस्थापक सोमशेखर वडलामनी, मुख्य व्यवस्थापक संजय बुरबुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

परिवर्तन हा माणसाच्या अायुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. समाजात अापली पत कायम राहावी यासाठी प्रामाणिकपणे वागा. बुलेट गाडी अाज घेतलात, पाच वर्षांनी कार घेण्याचे स्वप्न पाहा. गाडीचे हप्ते नियमित भरा, अापली पत ठेवा. बुलेट गाडीमुळे पोलिस अधिक कार्यक्षमतेने काम करतील, असे मत श्री. सेनगावकर यांनी व्यक्त केले. बुलेटवर फिरताना हेल्मेट वापरा. पासिंग झाल्याशिवाय वाहन रस्त्यावर अाणू नका, असे ते म्हणाले. अगदी कमी व्याजदर म्हणजे ९.३५ टक्क्याने वाहनकर्ज पोलिसांना दिले अाहे. भविष्यात ग्रुपने घरासाठी कर्जाची मागणी केल्यास त्याचाही विचार केला जाईल, असे मत श्री. भावसार यांनी व्यक्त केले. पोलिसांसाठी ३०० गाड्या मंजूर केल्या अाहेत. त्यापैकी २०० गाड्या पासिंग अाहेत. अाज १५१ गाड्यांचे वितरण झाले. नोव्हेंबर अखेरपर्यंत अाणखी २०० गाड्या मंजूर होतील, असे सांगण्यात अाले. चव्हाण मोटार्सचे शिवप्रकाश चव्हाण घनश्याम चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सहायक अायुक्त सुभाष नेवे, हनुमंत परांडे, शर्मिष्ठा घारगे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. १५१ पोलिसांना एकदमच गाड्यांचे वाटप करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...