आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्रा योजनेअंतर्गत जिल्ह्यात १६.८५ कोटींचे कर्ज मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्यात प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा बँक वगळता इतर सर्व बँकांनी २५ सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबविली. याद्वारे हजार २६५ लाभार्थ्यांना १६ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज शिशु योजनेखाली येतात. त्यानंतरची ५० हजार ते लाख रुपयांपर्यंतची कर्ज किशोर योजनेखाली येतात. तर लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज तरुण योजने अंतर्गत येतात.
शिशू योजनेंतर्गत हजार ८२३ लाभार्थ्यांना कोटी ८२ लाख, किशोर योजनेंर्गत २०१ खातेदारांना कोटी ८३ लाख तर तरुण योजनेमध्ये २४१ जणांना खाते कोटी २३ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत २५ जानेवारीपर्यंत सर्व बँकांना प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीचे बँक खाते उघडण्याबाबत सूचना होत्या. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील एकूण घरांची संख्या लाख ६९ हजार ७६९, अर्धशहरी / ग्रामीण लाख हजार २७८ तर शहरी लाख ६७ हजार ४०१ अशी एकूण ८.६९ लाख बँक खाती उघडण्यात आली आहेत.

सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत सर्व बँकांनी लाख ९३ हजार ५९४ ग्राहकांना समाविष्ट करून घेतले आहे. यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये ९६ हजार २३४, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लाख ९५ हजार ४२८, अटल पेन्शन योजनेमध्ये हजार ९३२ असे एकूण लाख ९३ हजार ५९४ ग्राहकांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...