आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा कीर्तनकार चार भाषांतून करतो अध्यात्माचा प्रचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विठुरायाच्या भक्तीची वाणी महाराष्ट्रासह देश-परदेशात पाेहोचावी म्हणून बार्शीच्या साकतगावचे सौरभ मोरे महाराज हे युवा कीर्तनकार मराठीसह इंग्रजी, हिंदी कन्नड भाषेतून विठुरायाच्या भक्तीचे गोडवे गाऊन कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रचार करत आहेत.

सौरभ महाराज वय सध्या १६ वर्षे आहे. वयाच्या सहाव्या वर्षांपासून कीर्तनात रंगतात. हिंदीत रामकथा, मराठी कन्नड भाषेत प्रवचन कीर्तन करतात. शिवाय इंग्रजीत कीर्तन सांगतात.
सध्या ११ वीत शिकणारे सौरभ महाराज यांना पुढे डॉक्टर व्हायचे आहे. त्या दृष्टीने त्यांचा अभ्यासही सुरू आहे. या माध्यमातून पुढे परदेशात जाऊन ते भक्तीचा प्रसार करणार आहेत.
कन्नड कीर्तनाची सीडी प्रकाशित
श्रीग्रामदैवत सिध्देश्वर महाराज मंदिरात विठुरायाचे कन्नड भाषेत कीर्तन सादर करून त्याची सीडी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यात संपूर्ण गीतांची रचना ही महाराजांनी केली आहे. याशिवाय त्यांच्या हिंदीत रामकथाही प्रसिद्ध आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कीर्तन केले आहे.

इंग्रजी भाषेत कीर्तनाची अशी केली बांधणी
सौरभमहाराज हे वयाच्या सहाव्या वर्षापासून रामकथा सांगातात. समाज जागृतीच्या विविध विषयांवर एकूण ६६४ कीर्तनाचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत. त्यांनी स्वत: इंग्रजी भाषेतून वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम केला. यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या, स्त्री शिक्षण, भ्रष्टाचार विरोध, स्वच्छता अभियान या विषयांवर त्यांनी प्रवचन दिले. या विविध विषयांना धरून त्यांनी ६६४ प्रयोग सादर केलेे आहेत.

अशी केली साधना
सौरभमहाराज मोरे यांच्या कुटुंबांची वारकरी संप्रदायाची परंपरा. वडील दत्तात्रय यांच्या सहवासात अनेक वेळा कीर्तनाला जात. त्यांच्या सहवासात त्यांना कीर्तनाची गोडी लागली. वडिलांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी मुलाला घरी रीतसर कीर्तनाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सौरभ महाराज यांनी उत्तम प्रतिसाद दिला. कीर्तन, पारायण, प्रवचनासह संत साहित्याचा अभ्यास केला. शब्दांचे अर्थ समजावून घेत दिग्गजांकडून त्याचे ज्ञानार्जन केले. त्यातून एक समृद्ध कीर्तनकार घडत गेले. आज सौरभ महाराज यांना रामायणाचार्य ही पदवी मिळाली आहे. अध्यात्म प्रचारासाठी अग्रेसर आहेत.