आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता अाैरंगाबादेत बांधा १७ मजल्यांचे अपार्टमेंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र शासनाने शहर विकास िनयमावली दुरुस्तीची सूचना काढली आहे. सोलापूर, औरंगाबादसह ‘ड’ वर्गातील १४ महापालिकांना ती तत्काळ लागू करण्याचे अादेश िदले. नव्या नियमावलीत एकूण परिसर, रस्ते, पाणी, बांधकामाची उंची, मोकळी सोडावयाची जागा याची सविस्तरपणे मांडणी केली आहे.
महाराष्ट्र नगररचना कायदा १९६६ मध्ये राज्य सरकारने दुरुस्ती केली. २० सप्टेंबर २०१६ रोजी यासंदर्भातील अादेश शासनाच्या नगरविकास खात्याकडून काढण्यात अाला. नव्या नियमावलीत शासनाने एफएसअाय देताना हात थोडा अाखडता घेतला असल्याचे दसून येते. क्रेडाईने अशा शहरांमध्ये १.३ एफएसअाय देण्यात यावा, अशी मागणी केली होती; पण प्रत्यक्षात १.१ इतकाच एफएसअाय मंजूर झाला. पण हे करताना ५० मीटरपर्यंत म्हणजे १७ मजल्यांपर्यंत अपार्टमेंट बांधता येतील, अशी दुरुस्ती केली अाहे. अाता नव्या एफएसअाय िनयमानुसार एक हजार चौरस मीटर जागा असेल तर त्यावर १ हजार १०० चौरस मीटर बांधकाम करता येईल. मात्र अपार्टमेंट उंचीचे बांधण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना बाल्कनी, पार्किंग, पाणी, वीज, जिना आदी सुविधांबाबतचा प्रीमियम परवानगीने भरावा लागेल व त्यासाठीही परवानगी घ्यावी लागेल.

साईड व फ्रंट मार्जिन पूर्वी नऊ मीटर होते ते अाता सहा मीटर केले अाहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला. ३६ मीटरपासून पुढील उंचीच्या बिल्डींग परवानगीसाठी महापालिकेच्या बांधकाम परवानगी देणाऱ्या उच्चस्तरीय समितीची मंजुरी अावश्यक केली आहे. अशा प्रकारच्या तीन कमिट्या स्थापन करण्याची सूचना िनयमावलीत अाहे.

पार्कींगसाठी स्पष्ट िनयम
या नवीन िनयमावलीत चार चाकी वाहनांसाठी प्रती वाहन २.५ ते ५ चौरस मीटर, दुचाकीसाठी दीड ते दोन चौरस मीटर, ट्रान्स्पोर्ट वाहनांसाठी ३.७५ ते ७.७५ चौरस मीटर इतकी जागा सोडणे बंधनकारक करण्यात अाले अाहे.
या मनपांना फायदा
अौरंगाबाद, परभणी, लातूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला नांदेड-वाघाळा, जळगाव, अहमदनगर, धुळे, मालेगाव.
बांधकामनिहाय पार्किंग पुढीलप्रमाणे
{ गर्दीच्या िठकाणी ८० स्क्वेअर मीटर घरगुती बांधकाम (अपार्टमेंटसह) असेल तर ५ ते ८ मीटर जागा पार्किंगसाठी.
{ रुग्णालय, मल्टिप्लेक्स, मंगल कार्यालये अादी
जागी ९ मीटरपर्यंत (प्रति ८० चौ.मी.) जागा सोडावी लागणार अाहे.
{ शैक्षणिक संस्थांसाठी १८ ते ४१ मीटर इतकी जागा पार्किंगसाठी साेडणे बंधनकारक करण्यात अाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...