आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 17 Two Wheelers Along With Four Suspects Arrested

१७ दुचाकींसह चौघा संशयितांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरसह पुणे येथे विविध ठिकाणी दुचाकी चोरून विकणाऱ्या टोळीला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. तब्बल सतरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. स्वप्नील चंद्रकांत देवकर (वय २२), सोमनाथ मारुती लाटे (वय २३, रा. दोघे महाळुंग, माळशिरस), उत्तम शामराव गुंगे (वय ४५, रा. गोणेवाडी, मंगळवेढा), जानेश्वर भिवा खाडे (वय २८, रा. श्रीपूर, माळशिरस) या चौघांना अटक करण्यात आली आहे. २३ जुलै रोजी एक दुचाकी अशोक चौकातून चोरीला गेली होती. ती विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. दमाणीनगराजवळील जगताप रुग्णालयाजवळ स्वप्नील सोमनाथ यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी साथीदार उत्तम आणि जानेश्वर या दोघांची नावे सांगितली होती. चौघांना ताब्यात घेण्यात आले असून सतरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्या गुंगेवस्ती येथे ठेवल्या होत्या.

दोन तरुणी जखमी
सायकलवरूनकॉलेजला जाताना दुचाकीची (एमएच १३ बीपी ४७३४) धडक बसून दोघी महाविद्यालयीन तरुणी जखमी झाल्या आहेत. हा अपघात एनजी मिल चाळजवळ सोमवारी सकाळी घडला. मयूरी तम्मेदार (रा. दमाणीनगर) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. मयूरी तिची मैत्रीण भाग्यश्री पांडे दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर दुचाकीस्वार पळून गेला आहे. दोघींना गंभीर दुखापत झाली आहे.

दुष्कर्म,तरुणाला कोठडी
अक्कलकोटतालुक्यातील कोन्हाळी येथील एका महिलेला दमदाटी करून दुष्कर्म केल्याप्रकरणी एका तरुणाला तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली. पीडित महिलेने अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदीप शंकर जाधव (रा. कोन्हाळी) याला अटक झाली असून सोमवारी त्याला विशेष न्यायाधीश जाधव यांनी पोलिस कोठडी दिली आहे. सोमवारी फिर्याद दिल्यानंतर कारवाई झाली होती. मागील सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. याशिवाय जाधवने पीडित महिलेच्या घरी जाऊन दमदाटी करीत सोन्याचे दागिने पैसे घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी घटनेचा तपास केला आहे. सरकारतर्फे अॅड. आनंद गोरे यांनी काम पाहिले.