आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू, मुरूम विक्रीतून मिळाले 172 कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नोटाबंदीमुळे सरकारी महसुलाला फटका बसला असला तरी गौण खनिज कार्यालय मात्र यास अपवाद ठरले आहे. २०१६-१७ या वर्षात शासनाने १०४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते, त्या बदल्यात गौण खनिज कार्यालयाने १६६ टक्के म्हणजेच १७२ कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा राहिला तो वाळू लिलावाचा. वाळू लिलावातून १३० कोटी ४२ लाख, मुरूम उपसा परवानगीतून ३५ कोटी दोन लाख तर विनापरवाना वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईतून तब्बल सात कोटी ५२ लाख रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
 
२०१६-१७ या वर्षात जिल्ह्यास सर्वाधिक महसूल वाळू लिलावातून मिळाला आहे. पंढरपूर तालुक्यातून सर्वाधिक ६५ कोटी १० लाख रुपये मिळाले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातून १३ कोटी २४ लाख, अक्कलकोट तालुक्यातून २५ कोटी, मोहोळ तालुक्यातून ११ कोटी २२ लाख, करमाळा तालुक्यातून ९० लाख, सांगोला तालुक्यातून ९३ लाख, मंगळवेढा तालुक्यातून १९ कोटी ३० लाखांचा महसूल मिळाला.
 
तालुकानिहाय मिळालेला महसूल...
उत्तर सोलापूर कोटी ६७ लाख, दक्षिण सोलापूर २३ कोटी ४६ लाख, अक्कलकोट २८ कोटी १२ लाख, बार्शी कोटी २९ लाख, माढा कोटी ७४ लाख, मोहोळ १४ कोटी ४७ लाख, करमाळा कोटी ७६ लाख, पंढरपूर ६५ कोटी १० लाख, सांगोला कोटी ८० लाख, मंगळवेढा २१ कोटी ३४ लाख, माळशिरस कोटी १७ लाख.
 
७.५२ कोटी दंड वसूल
विनापरवाना वाळू उपसा वा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जिल्हा पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. ५४५ प्रकरणांतून कोटी ५२ लाख रुपयांचा महसूल मिळाला. उत्तर तालुक्यात कोटी १९ लाख, दक्षिण ६६ लाख, माढा ४४ लाख, मोहोळ ४७ लाख, करमाळा ७१ लाख, पंढरपूर कोटी ५६ लाख, सांगोला कोटी ६० लाख दंड वसूल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...