आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अठरावं वरीस पहिल्या मतदानाचं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नवयुवक व युवतींनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर “अठरावं वरीस मोक्याचं गं, पहिल्या मतदानाचं’ हे बोल खरे ठरवले. राज्यातील १० महानगरपालिकांसाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकांमध्ये नव उमेदवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तरुणाई मतदानावेळी मात्र मतदानासाठी सक्रिय दिसली. तरुणाईने स्वत: तर मतदान केलेच. शिवाय मित्र -मैत्रीणींंनाही प्रोत्साहित केले.  

शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर तरुणाईने सकाळच्या पहिल्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर बोटावर लावलेल्या शाईचा सेल्फी काढत त्यांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक व ट्विटरवर पोस्ट केले. ग्रुपच्या मित्र मैत्रिणींना कॉल करून घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत घेऊन गेले. मतदान जागृती करत सबंध महाराष्ट्राला विविध माध्यमांनी ढवळून काढले. तसेच दिवसभर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण केलेल्या मतदानाचे शाई लावून रंगवलेले बोट दाखवलेल्या डीपीतील छबी दिवसभर सर्वत्र फिरल्या. 
बातम्या आणखी आहेत...