Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» 2 Arrested In Madha For Fraud

नोकरीच्या आमिषाने फसवणूक; आरोपींचा जामिन अर्ज नामंजुर, अनेकांचा सहभाग असल्याचा संशय

प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवुन माढा शहर व परिसरातील बेरोजगार तरुणांना लाखोंचा गड्डा घालणाऱ्या

दिव्य मराठी वेब टीम | Oct 09, 2017, 19:57 PM IST

सोलापूर- प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवुन माढा शहर व परिसरातील बेरोजगार तरुणांना लाखोंचा गड्डा घालणाऱ्या सुधीर मानेचा ताबा विजापूर पोलिसांनी घेतला आहे. तर माध्यमिक शिक्षक जहाँगीर चांद तांबोळी याचा जामिन माढा न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. शर्मा यांनी फेटाळला आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. विशाल सक्री यांनी काम पाहिले.
माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी या आरोपींना अटक केली होती. अटक करुन त्यांना कोर्टासमोर हजर केले असता या दोघा संशयित आरोपींना 7 ऑक्टोबर पर्यत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तर संशयित आरोपी सुधीर माने याच्याविरोधात नोकरीचे आमिष दाखवुन साडेचार लाख रुपयाची फसवणुक केल्याचा गुन्हा विजापुर नाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्याने विजापुर नाका पोलिसांनी सुधीर माने यास चौकशीसाठी सोलापूरला नेले आहे.
सुधीर माने हा 13 ऑक्टोबरपर्यंत विजापुर पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. केवड (ता. माढा) येथील बाळु बाबासाहेब पासले याने माढा पोलिसात नोकरीचे आमिष दाखवुन 14 लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. फसवणूक प्रकरणात अटक केलेला पहिला आरोपी सुधीर माने याची अधिक चौकशी केली असता त्याने जहाँगिर तांबोळी हे शिक्षक यात सामील असल्याचे सांगितले. त्यास माढा पोलिसांनी अटक केली. तांबोळी याच्या झालेल्या चौकशीत त्याने या प्रकरणात अकलुज येथील मेरी या गावचा बाबर आडनावाची व्यक्ती व बारामती येथील वाघ नावाची व्यक्ती सामील असल्याचे सांगितले आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended