आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील मोळी अंगावर पडून 2 जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील मोळी अंगावर पडून रस्त्यांच्या कडेला थांबलेले वयोवृध्द जोडपे जागीच ठार झाले. ही घटना करमाळ्याजवळ घडली आहे.

 

 

साहेबराव चांदणे व मीराबाई चांदणे अशी मृत पती-पत्नींची नावे आहेत. हे दोघे रस्त्याच्या बाजूला शेळ्यांसाठी पाला गोळा करत होते़. तेवढ्यात जवळून जाणाऱ्या ट्रकमधील ऊसाची मोळी अचानक अंगावर पडली. यात जीव गुदमरून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. करमाळा पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी वैराग ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...