आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच दिवशी होणार २ लाख वृक्ष लागवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला - हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील ९ ठिकाणच्या वन परिक्षेत्रात १ जुलै रोजी लोकसहभागातून २ लाख ७ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

तालुक्यात कटफळ वनपरिक्षेत्रात ३९ हजार, बागलवाडी ३९ हजार, मेडशिंगी २८ हजार, लोटेवाडी २५ हजार, कोळा १८ हजार, राजुरी १५ हजार, घेरडी १५ हजार, पाचेगाव १५ हजार, य. मंगेवाडी १३ हजार अशी एकूण २ लाख ७ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. ही लागवड लोकप्रतिनिधी यांच्या तसेच कर्मचारी, ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यासाठी वनविभागाच्या वतीने आवश्यक ती पूर्ण तयारी करण्यात आली आहे. या वृक्षारोपणासाठी लागणारी रोपे वनविभागाच्या अचकदाणी रोपवाटिकेत तयार करण्यात आली असून तालुक्यातील ९ गावांत व परिसरातील कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामसभा घेऊन वैयक्तिक गाठीभेटी घेऊन लोकसहभागातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.

लोकसहभाग गरजेचा : वृक्षारोपणाचा फायदा त्या परिसरालाच भविष्यात होणार आहे. ही वृक्षलागवड चळवळ लोकसहभागाशिवाय यशस्वी होणे शक्य नाही. या वृक्षारोपण कार्यक्रमातून तालुक्यातील ९ ठिकाणच्या वनपरिक्षेत्रात सीताफळ, लिंब, अंजन, बाभूळ, चिंच, आवळा, कारंज, मेडसिंगी, शमी, आपटा अशा विविध प्रजातींची झाडे लावली जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...