आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाखांची अवैध दारू पकडली; दोघांना अटक, मुरुम पोलिसांची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येणेगूर - मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैद्य विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या जीपसह दोघांना कारवाई करून ताब्यात घतले. शनिवारी (दि.२) रात्री च्या सुमारास आष्टाकासा ते आलूर मार्गावर ही कारवाई झाली. यावेळी पोलिसांकडून लाख २०, १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
 
लोहारा तालुक्यातील आष्टा कासार ते आचलेर मार्गावर अवैद्य विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मुरूम पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून जीप क्र. एमएच २४ व्ही २१६४ ताब्यात घेऊन तपासणी केल्यानंतर आतमध्ये विदेशी दारूच्या १४४ बाटल्या (किंमत २०,१२०) आढळून आली. यावेळी जीपमधील अनिल चंद्रकांत फुलमाळी बसवराज मल्लिनाथ ब्याळीकुळे (दोघे रा. आलूर ता. उमरगा) यांना अटक करून जीपसह दारू ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई मुरूम पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ए. एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए. पी. खोडेवाड, डी. पी. सानप, हेड कॉन्स्टेबल जाधव, हिपरकर, नितीन गुंडाळे आदींनी केली. 
बातम्या आणखी आहेत...