आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉवेल उत्पादनखर्चात २% घट: ५० कोटींच्या वर उलाढाल नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ५०कोटींच्या आत उलाढाल करणाऱ्या उद्योग-व्यापाराची ‘एलबीटी’तून (स्थानिक संस्था कर) सुटका झाली. त्याचा मोठा लाभ यंत्रमागधारकांना होईल. शहरात तयार होणाऱ्या टेरिटॉवेल, नॅपकीन आणि चादरींच्या उत्पादन खर्चात टक्के घट होणार असल्याचे कारखानदार म्हणतात. त्याने बाजारातील तीव्र स्पर्धेत लढण्यासाठी थोडेसे बळ मिळेल, असेही त्यांना वाटते.
यंत्रमागांचा प्रमुख कच्चा माल हा सूत आहे. सिंथेटिक सुतावर तर कॉटनवर टक्के एलबीटी होता. शिवाय रंग-रसायनांच्या खरेदीवरही टक्के एलबीटी भरायचे. या करांमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली होती. शहर आणि शहराबाहेर उत्पादित होणाऱ्या उत्पादनांच्या दरातच मोठी तफावत निर्माण झाली. देश आणि परदेशातील उत्पादनांच्या तुलनेत सोलापूरची उत्पादने महाग झाली. त्यामुळे पक्क्या मालाची मागणी घटली. गेल्या काही वर्षांपासून मंदी आली. अशा गर्तेत सापडलेल्या कारखानदारांना एलबीटीमुक्तीने दिलासा मिळाला. शिवाय क्लिष्ट प्रणालीतून सुटकाही.

निर्यातदारही सुटले...
५०कोटींच्या वर उलाढाल करणारे कारखानदार, निर्यातदार बोटावर मोजण्याइतकेच आहेत. परंतु त्यांच्या उद्योगातील ‘फर्म’ मात्र वेगवेगळे आहेत. एकाच छताखालील ५० यंत्रमागांची धडधड असली तरी त्यांची गणना युनिटनिहाय होते. त्यामुळे सारेच उद्योजक एलबीटीतून बाहेर पडले. निर्यातदारदेखील या कचाट्यातून बाहेर पडले.

दिलासा मिळाला
अक्कलकोटरस्ता एमआयडीसी शहराच्या हद्दीत असल्याने सर्वच कारखानदार एलबीटीच्या जाचक कायद्यात अडकले होते. शिवाय गांधीनगर, अशोक चौक, भवानी पेठ, घोंगडे वस्ती, दत्तनगर या नागरी वसाहतीतील कारखानदारही या कराच्या जाळ्यात होते. आता या सर्वांची सुटका झाली. पेंटप्पागड्डम, अध्यक्ष, यंत्रमागधारक संघ

नेमके काय होईल
१.कच्च्या मालावरील एलबीटी हटल्याने उत्पादन खर्चात घट
२. यंत्रमागासाठीचा पक्का माल दर किलोमागे साधारण रुपयांनी स्वस्त होणार
३. इतर राज्यांतील उत्पादनांच्या स्पर्धेत आता सहज उतरता येईल
४. एलबीटीमुक्तीमुळे शंभर टक्के कॉटनसाठी अधिक दर्जेदार उत्पादने घेणे शक्य
बातम्या आणखी आहेत...