आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Thousand Followers Will Attendant Cultural Festival

‘वसुधैव कुटुंबकम’साठी जाणार हजार साधक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जगभरातील विविध देशांनी जपून ठेवलेली प्राचीन सांस्कृतिक मूल्ये आणि मानवतेचा आशावाद बळकट करणाऱ्या वैश्विक परंपरांचा अधोरेखित करणारा भव्य असा सांस्कृतिक महोत्सव येत्या ११ ते १३ मार्चदरम्यान दिल्ली येथे होत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने याचे आयोजन असून या उत्सवात शहर-जिल्ह्यासह राज्यातील पाच जिल्ह्यातून जवळपास हजार साधक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. परिवाराच्या ३५ वर्षांच्या सेवाकार्याच्या निमित्ताने याचे आयोजन आहे.

सुमारे १५५ देशांतील ३५ लाख लाेकांच्या उपस्थितीत तसेच ३५ हजार कलाकार आपली कला सादर करणार आहेत. सात एकर जागेवर व्यापलेले विस्तीर्ण व्यासपीठ हजार एकर जागेत साजरा होणारा सोहळा हे याचे वैशिष्ट्य. कार्यक्रमास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत शेकडो आंतरराष्ट्रीय पाहुणे श्री रविशंकर यांची उपस्थिती असणार आहे. सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय, संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांचे सहकार्य लाभत आहे.

हे आहे विशेष : या उत्सवात ३५ हजार कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्यात हजार ५०० वादक ४० प्रकारच्या विविध वाद्यांवर शास्त्रीय संगीत रचना सादर करणार आहेत. दक्षिण अफ्रिकेतील ६५० ड्रम वादक, भारतातील छत्तीसगड, महाराष्ट्र आणि सिक्कीम राज्यातील अनेक आदिवासी बांधव आपली कला सादर करणार आहेत. महाराष्ट्रातील धनगरी ढोल दिल्लीत घुमणार आहे. सांगली काेल्हापूरमधील हजार ढोल वादकांची यासाठी निवड झाली आहे. येथेच होणाऱ्या योगा डान्समध्ये जगभरातील ४३ देशांमधून ५१० योगशिक्षक, भारतातील २४ राज्यांतून आलेले कलावंत सहा मिनिटांचा योगा डान्स करणार अाहेत. त्यांना सोलापूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड या पाच जिल्ह्यांतून हजारांपेक्षा जास्तजण साथ देणार आहेत. यात १५७ आर्टिस्ट इंडियन क्लासिकल कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यामध्ये ७४ तबलावादक, २८ हार्मोनियम वादक, बासरी, सतार, १४ पखवाज, १० वीणा, २० मृदंग, ढोलकी वादक आदींचा समावेश आहे.

सोलापुरातून जाणार हे
वीरतपस्वीचन्नवीर शिवाचार्य, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे १० वे वंशज बापू महाराज देहूकर, पंढरपूर ब्रह्मचैतन्य जयसंकुलाचे धैर्यशील देशमुख, बद्रिनाथ महाराज तनपुरे, आम्मा माताजी शांतादेवी, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज, अभिनव गुरुलिंग जंगम महास्वामी, एकनाथ महाराज लोमटे, सुहास माने, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, खासदार शरद बनसोडे आदी.