आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुहेरीकरणाला आणखी दोन वर्षे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - होटगीते गुलबर्गा लोहमार्ग दुहेरीकरण कामाचा मक्ता रद्द करण्यात आला आहे. परिणामी हे काम पूर्ण होण्यास आणखी दोन-अडीच वर्षे लागण्याची शक्यता आहे. दुहेरीकरणाचे काम अत्यंत मंद गतीने आणि नकिृष्ट दर्जाचे होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराचा मक्ता रद्द करण्याची शिफारस रेल्वे बोर्डाकडे केली होती. त्यानुसार बोर्डाने दुहेरीकरणाचे काम तत्काळ थांबवत ठेका रद्द केला.

हे काम सुमारे १६९ कोटी रुपयांचे होते. आता पुन्हा नव्याने टेंडर काढून दुहेरीकरणाचे काम सुरू करावे लागणार आहे. त्यामुळे या कामास आणखी विलंब होणार हे निश्चित. आता होटगी ते गुलबर्गा दुहेरीकरणाच्या कामासाठी पुन्हा एकदा निविदा काढावी लागणार आहे. यासाठी आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाईल. त्यानंतर कामाची प्रत्यक्षात सुरुवात होण्यास महिना-दोन महिने लागतील. कामाची मुदत २४ महिने असल्याने होटगी ते गुलबर्गा दरम्यानचे काम पूर्ण होण्यास २०१८ उजाडेल.

- डीआरएम थॉमस यांनी केली होती पाहणी
- ठेकेदारांवर होणार दंडात्मक कारवाई

वेल्डिंगचे काम दर्जाहीन
दोनरूळ जोडण्यासाठी फल्श बट वेल्डींग मशिनचा वापर आवश्यक असतो. परंतु, येथील ठेकेदार वेल्डिंगसाठी मशिनऐवजी साध्या पद्धतीचा वापर करत होता. याने अपघाताची शक्यता असते. डीआरएम जॉन थॉमस यांच्या पाहणीत ही बाब उघड झाली होती. त्यांनी ही माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक सूद यांच्या निदर्शनास आणली.

एशियन बँकेकडून १६०० कोटींचे कर्ज
वारंवार कळवूनही कामात सुधारणा गती नाही आली. होटगी ते गुलबर्गा अंतर ९५ किमीचे आहे. हैद्राबादच्या एचइआर-एसव्ही या कंपनीस मक्ता दिला होता. २४ महिन्यांची अवधी दिली होती. पण काम अत्यंत संथ गतीने सुरू होते. सोलापूर विभागाने वारंवार कळवूनही कामात सुधारणा गती आली नाही. तसेच कामाच्या बाबतीतही शंका उपस्थित झाल्याने मक्ताच रद्द करण्यात आला.

सोलापूर रेल्वे विभागात दौंड ते मोहोळ होटगी ते गुलबर्गा दरम्यान लोहमार्गच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. रेल्वे विकास निगम लि. च्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामासाठी एशियन बँकेकडून सुमारे १६०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

दुसरे टेंडर काढणार
सोलापूरते गुलबर्गा लोहमार्ग मक्ता रद्द केला आहे. त्याला अनेक कारणे जवाबदार आहेत. काम दिलेल्या मुदतीत चांगल्या पद्धतीने पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र मक्तेदारांनी रेल्वे नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे ठेकाच रद्द केला. आता दुसरे टेंडर काढून काम सुरू करण्यात येईल. जॉनथॉमस, विभागीय रेल्वे व्यवस्थापक

- ९५ किमीपैकी केवळ किमीच्या कामास महिन्याचा वेळ लागला. यावरून काम किती कासवगतीने सुरू होते, हे कळते.
- महिन्यांत केवळ किमीचेच काम ठेकेदाराने केले. एकूण काम पूर्ण करण्यासाठी वर्षांची मुदत दिली होती.
- होटगी ते गुलबर्गा मार्गावरील होटगी ते तिलाटी हे अंतर किमीचे आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून येथे दुहेरीकरणाचे काम सुरू होते.
बातम्या आणखी आहेत...