आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परतीच्या पावसाने उजनीसह मध्यम, २० लघु प्रकल्प भरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - परतीच्या पावसाने जिल्हावासीयांची शेती पिण्याच्या पाण्याची चिंता दूर केली आहे. जिल्ह्यातील उजनी धरणासह आठपैकी मध्यम प्रकल्प तर ५३ पैकी २० लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. उजनी धरण, मध्यम लघु प्रकल्पातील एकूण पाणीसाठा १३१ टीएमसीवर पोहोचला आहे. यापैकी उजनी धरणामध्ये ५९.६२ टीएमसी तर मध्यम प्रकल्पामध्ये ५.११ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण साठ्याबरोबरच बुद्धेहाळ मध्यम प्रकल्प २४ लघु प्रकल्पामध्ये अद्यापही उपयुक्त पाणीसाठा झालाच नाही.
मध्यम प्रकल्पामध्ये हिंगणी, जवळगा, पिंपळगाव ढाळे बोरी ही चार प्रकल्पे १०० टक्के भरली आहे तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकरूखमध्ये ४६ टक्के, मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आष्टी तलावात ७७ टक्के, करमाळा येथील मांगी तलावात सर्वात कमी २१ टक्के पाणीसाठा आहे.

लघु प्रकल्पामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील हणमगाव, रामपूर, अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव, गळोरगी, शिरवळवाडी, डोंबरजवळगे, भुरीकवठे, काझीकणबस, बोरगाव, बार्शी तालुक्यातील कोरेगाव, गोरमाळे, कारी, वालवड, काटेगाव, तावडी, ममदापूर, चारे, वैराग, कळंबवाडी, सांगोला तालुक्यातील जुनोनी हे २० लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. होटगी, पाथरी घेरडी हे मध्यम प्रकल्प ८० टक्केपेक्षा अधिक भरले आहेत.

या प्रकल्पांचा उपयुक्त पाणीसाठा शून्यच
मोहोळतालुक्यातील पोखरापूर, अक्कलकोट तालुक्यातील हंजगी, सातनदुधनी, करमाळ्यातील पारेवाडी, वडशिवणे, हिंगणी के.,म्हसेवाडी, वीट, कोंढेज, राजुरी, नेर्ले, सांगवी, माढ्यातील सापटणे, परिते, िनमगाव, सांगोल्यातील अचकदाणी, चिंचोली, हंगिरगे, मंगळवेढा तालुक्यातील भोसे, पडवळकरवाडी, हुलजंती, तळसंगी, लवंगी, मारोळे, डोंगरगाव या लघु प्रकल्पामध्ये शून्य टक्के उपयुक्त साठा आहे.

पुरवठा बंद, उजनीवरील वीजनिर्मिती थांबली
परतीचा पाऊस थांबल्याने धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये घट झाली आहे. यामुळे धरणातून वीजनिर्मितीसाठी देण्यात येणारे १५०० क्युसेक पाणीही बंद करण्यात आले आहे. आता धरणातून फक्त कालव्यामध्ये १८०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. धरणामध्ये एकूण १२३.२९ टीएमसी पाणीसाठा असून ५९.६२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
बातम्या आणखी आहेत...