आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतणीच्या लग्नात खर्च टाळून मूकबधिर शाळेला 21 हजारांची मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाळा- येथील नगरसेवक डॉ. अविनाश घोलप यांनी पुतणीच्या लग्नात अनावश्यक खर्च टाळून कोर्टी येथील ज्ञानप्रबोधिनी मूकबधिर शाळेला २१ हजार रुपयांची मदत दिली. शनिवारी (दि. २७) विवाहावेळी त्याचा धनादेश जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल कोलते यांच्याकडे सुपूर्द केला. यातून घोलप यांनी विवाह समारंभात होणारा वारेमाप खर्च टाळण्याचा, त्यातून वाचलेल्या पैशातून आणि आर्थिक स्थिती भक्कम असल्यास वंचितांना मदतीचा संदेश दिला आहे. 

लग्नसोहळा म्हटला की खर्च आलाच. त्यात कितीही खर्च केलातरी तो वायफळ वाटत नाही. त्यातच एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरी लग्न म्हटल्यावर समाजातील मान्यरांसह पुढारी मंडळी येणार हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागतावरही खर्च करणे आलेच. दिमाखदार स्वागताची पाहुण्यांची अपेक्षा असो अथवा नसो आपल्या ऐपतीप्रमाणे चांगल्याप्रकारे स्वागत करण्याची आपली संस्कृती आहे. परंतु नगरसेवक घोलप यांनी आपल्या पुतणीच्या लग्नात असा खर्च टाळला. त्यांच्या पुतणीचा शनिवारी विवाह झाला. त्यांनी या सोहळ्यातच २१ हजार रुपयांचा धनादेश मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी दिला. यावेळी विलास घुमरे, सचिन गायकवाड यांच्यासह वऱ्हाडी उपस्थित होते. 

आपण समाजाचेकाही तरी देणे लागतो, या भावनेतून ही मदत दिली. जेव्हा संधी मिळते तेव्हा मदतीचा माझा प्रयत्न असतो. लग्नात होणारा अनावश्यक खर्च टाळणेही गरजेचे आहे. तसेच वंचितांनाही मदत करायला हवी. 
- डॉ.अविनाश घोलप,नगरसेवक, करमाळा 
बातम्या आणखी आहेत...