आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षीय मुलाने अात्महत्या केल्यानंतर अाईने छोट्या मुलाला बिलगून व्यक्त केले दु:ख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटमध्ये बीसीएच्या द्वितीय वर्षात शिकणारा मुलगा. वडिलांना व्यापारात मदत करीत. मित्रांमध्ये हसत खेळत राहणारा. घरातही सर्वांचा लाडका. अचानक अायुष्य संपवून घेईल, असे कुणाच्याही ध्यानी नाही. त्याने घरी गळफास घेऊन अायुष्यच संपविले. अाई-वडिलांना हा धक्काच होता.
 
त्याचा छोटा भाऊ पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतोय. ही घटना समजल्यानंतर तो दुपारी दीडला घरी अाला अन् अाईला बिलगला. मायलेकरांचा बांध फुटला. राम-लक्ष्मणची माझी जोडी होती रे, राम गेला, जोडी तुटली रे असे म्हणत अाईने हंबरडा फोडताच उपस्थित नातेवाईक, मित्र, शेजारील महिलांना अश्रू अावरले नाहीत. हा दुर्दैवी प्रकार घडला अाहे अशोक चौकाजवळील न्यू पाच्छापेठेत. मुरलीधर श्रीनिवास शेगूर (वय २२) याने घरी गळफास घेतला अाहे. घटनेचे कारण समोर अाले नाही. शनिवारी सकाळी साडेसातला हा प्रकार घडला. 
 
वडील श्रीनिवास शेगूर हे टाॅवेल, चादर एस्कॉर्ट करतात. अाई विजयालक्ष्मी गृहिणी. भाऊ वृषभ हा पुण्यात अार्किटेक्ट महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकतोय. मुरलीधर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपला होता. सकाळी वडिलांनी त्याला खालूनच अावाज दिला. अाईनेही अावाज दिला. तो उठला नाही म्हणून दोघे वर गेले. दरवाजा जोरदार ढकलल्यामुळे उघडला. समोर मुलाचे दृश्य दिसले. दाराच्या हुकालाच गळफास घेतला होता. दोघेजण स्तब्ध झाले. पोलिसांना घटनेची माहिती दिली. जेल रोड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी अाणला. 
 
क्रिकेटची अावड अन् मित्रांमध्ये गप्पा : त्यालागाणी एेकण्याची, चित्रपट पाहण्याची अावड. मित्रांमध्ये गप्पाही मारत असत. क्रिकेटची त्याला अावड होती. नेहमीच तो सकारात्मक विचार करत होता, अशा अाठवणी मित्रांनी शासकीय रुग्णालयात सांगितल्या. काॅलेजातील मित्र घरी रुग्णालयातही जमले होते. 
 
ब्लूव्हेलची चर्चा ? 
मुरलीधरच्या लॅपटाॅप मोबाइलमध्ये संशयास्पद काहीही आढळले नाही. ब्लू व्हेलची अफवा होती. पण, पोलिसांनी नातेवाईकांनी खातरजमा केली असता तसा प्रकार नव्हता. तो वापरत असलेला मोबाइल साधा होता. अॅड्राँईड मोबाइलवरच हा गेम खेळता येताे. वयोमर्यादा १४ वर्षांची अाहे. 
 
मुरलीधरचे डोळे दान, उद्या प्रत्यारोपण 
२२वर्षीय मुरलीधर शेंगूर याच्या डोळ्याचे नातेवाइकांकडून दान करण्यात आले. मुरलीधरचे डोळेदेखील हे जग पाहणार आहेत. सिव्हिलच्या नेत्र विभागाकडून डोळे काढून घेण्यात आलेत. दान केलेल्या दोन डोळ्याचे उद्या प्रत्यारोपण केले जाईल. यादीप्रमाणे गरजूंना बोलवण्यात आले आहे. तपासणी करून ज्यांना डोळे मॅच होतील, त्यांना बसवण्यात येतील, अशी माहिती नेत्र विभागप्रमुख डॉ. एस. सरवदे यांनी दिली. 
 
तपास सुरू अाहे 
मुरलीधरने हाप्रकार का केला याची चौकशी सुरू अाहे. अाक्षेपार्ह असे काहीच अाढळले नाही. मोबाइल लॅपटाॅपमध्येही संशयास्पद काहीच नाही. नातेवाइकांकडून माहिती जाणून घेत अाहे. 
- केरू जाधव, फौजदार, जेल रोड ठाणे 
 
‘मला पाणीपुरी खायची अाहे’ 
मुरलीधर हा कधीही तणावात दिसत नव्हता. काॅलेजात जाऊन अाल्यानंतर मला व्यवसायात मदत करीत होता. त्याच्या अावडीनुसार शिक्षण घेत होता. त्याने असा प्रकार का केला हे ईश्वरालाच माहीत. शुक्रवारी रात्री अाईला म्हणाला, ‘मला पाणीपुरी खायची अाहे.’ पाणीपुरी खाल्ले, जेवण केले एकत्रित. बारावीनंतर तो अभियांत्रिकी महाविद्यालयात एक वर्ष शिकला. पुन्हा साइड बदलून बीसीए विभागात अाला होता, अशी माहिती वडील श्रीनिवास यांनी दिली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...