आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसांत २५ किलो चांदी अन् दीड लाख रोख जमा : सुवर्ण सिद्धेश्वर महाअभियान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटो
सोलापूर- सुवर्णसिद्धेश्वर महाअभियानाअंतर्गत अवघ्या दिवसांत २५ किलो चांदी आणि दीड लाख रुपये रोख देणगी मंदिर समितीकडे जमा झाली आहे. दैनिक दिव्य मराठीने जानेवारी महिन्यात सुवर्ण सिद्धेश्वर ही संकल्पना मांडली होती.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत श्री बृहन्मठ होटगी संस्था आणि नेताजी सुभाषचंद्र शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ११ किलो चांदी देण्यात आली. यावेळी मठाचे मठाधिपती तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामी, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, शिवकुमार स्वामी, आण्णाराव कुंभार, शांतय्या स्वामी, डॉ. इरेश स्वामी, नंदकुमार मुस्तारे, मल्लिकार्जुनप्पा वाकळे, सिद्धेश्वर बमणी उपस्थित होते.

तसेच कुमठे येथील सिद्धेश्वर प्राथमिक शाळेतर्फे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मंदिराला ११ किलो चांदी भेट देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत रोड्डे, अरुणा हावनूरकर, सिद्धाराम म्हेत्रे, पंचप्पा बिराजदार, महानंदा ढंगे, गुरुपादप्पा बिडवे, प्रतिभा बगले, आरती गायकवाड, काशीराव पाटील यांच्यासह अध्यक्ष धर्मराज काडादी उपस्थित होते.

चारदिवसांतील भरीव देणग्या (रुपयांत)अरुणा बसवराजकापसे - ५१ हजार, अमृत सिद्रामप्पा काेनापुरे - ४० हजार, इष्टलिंग सिद्धप्पा चितली - ३५ हजार, चंद्रभागा ताराचंद पाटील - २१ हजार, सैदप्पा श्रीमंतप्पा परमशेट्टी - २१ हजार, सी. जी. सालीमठ - १२ हजार, पवन विठ्ठलदास भुतडा - ११ हजार, दौलप्पा बसवणप्पा भैरामडगी - ११ हजार, महालिंगप्पा शंकरेप्पा ताडमारे - १० हजार.
बातम्या आणखी आहेत...