आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25% Of Families In The City Are Not Exposed To The Toilet

शहरात २५% कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरचा समावेश स्मार्ट सिटीत व्हावा, यासाठी चर्चा झडत असताना शहरातील २५ टक्के कुटुंबांकडे शौचालय नाही असे उघड झाले आहे. २१ ते २७ जुलै २०१५ या कालावधीत शहरातील लाख २० हजार कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला. सुमारे २५ टक्के कुटुंबांकडे शौचालय नाही आणि त्यातील सुमारे सहा टक्के कुटुंबे शौचाला उघड्यावर जातात, असे वास्तव पुढे आले आहे.
महापालिका झोन क्रमांक दोनमध्ये अक्कलकोट रोड आणि विडी घरकुल परिसरात सर्वात जास्त २२६९ कुटुंबे उघड्यावर शौचास बसतात, त्यानंतर होटगी रोड विजापूर रोड भागात १९९५ कुटुंबे उघड्यावर शौचास बसतात. शहराच्या गावठाण भागात सर्वात कमी म्हणजे ८५
कुटुंबांकडे शौचालय नाही असे उघड झाले आहे. ९५टक्के सर्व्हे पूर्ण : स्वच्छभारत, स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ सोलापूर अंतर्गत शहरातील शौचालयांचे सर्व्हे करण्याचे आदेश शासनाने दिले.
त्यानुसार नियोजन करून २१ ते २७ जुलैपर्यंत सर्व्हे करण्यात आला. यासाठी १०० शिक्षकांसह ५०० जणांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडून ९५ टक्के सर्व्हे पूर्ण झाला असून, त्याचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला आहे. आरोग्यनिरीक्षकांची बैठक : सहाय्यकआयुक्त प्रदीप साठे सर्वेक्षणाचे समन्वयक दत्तात्रय चौगुले, सफाई अधीक्षक संजय जोगदनकर यांनी
मंगळवारी सायंकाळी आरोग्य निरीक्षकांची बैठक घेतली. बैठकीत सर्वेक्षणाच्या बाबतीत आढावा घेतला.
२% कुटुंबे भागीदारीत शौचालय वापरत आहेत
- झोन आठ मध्ये सर्वाधिक ६५५४ कुटुंबे सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात तर झोन पाचमध्ये सर्वात कमी २९० कुटुंबे.
- झोन क्रमांक पाचमध्ये भागिदारीत शौचालय वापरणारी कुटुंबे फक्त आहेत.
झोन क्रमांक दोनमध्ये वैयक्तिक शौचालय वापरणारी सर्वाधिक १२ हजार ८५ कुटुंबे
-१ लाख २० हजार कुटुंबांची करण्यात आली पाहणी
सहा टक्के कुटुंबे आजही शौचास बसतात उघड्यावर
-७५% कुटुंबांकडे आहे शौचालय.
-२५% कुटुंबांकडे शौचालय नाही.
-६% कुटुंबे उघड्यावर शौचास बसतात असे आढळले आहे.
-५ ते १०% कुटुंबांचे सर्वेक्षण बाकी.
धक्कादायक प्रकार
सोलापूर शहरात २५ टक्के कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले असेल तर ते खूपच धक्कादायक आहे. स्मार्ट सिटी करण्यासाठी शहराची ही परिस्थिती बदलली पाहिजे. याआधीच्या काळात शौचालये बांधण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात रकमा आल्या
पण त्यात गैरव्यवहार झाला. त्यामुळे ही योजना रखडली. १५ ते २० हजार शौचालय बांधता येईल. प्रवीण डोंगरे, उपमहापौर
उघड्यावर शौचास बसणारी कुटुंबे
झोन क्रमांक दोनमध्ये सर्वात जास्त २२६९ कुटुंबे/विडी घरकुल, अक्कलकोट रोड परिसर.
गावठाण भागात सर्वात कमी ८५ कुटुंबे / कसबा, बाळीवेस परिसर
काय सांगतो सर्व्‍हेचा अहवाल
७.६९ हजार कुटुंबे उघड्यावर शौचास बसतात.
२३.९६ हजार कुटुंबे करतात सार्वजनिक शौचालयांचा वापर.
२.२२ हजार कुटुंबे भागिदारीत वापरतात शौचालय.
८८.४ हजार कुटुंबांकडे आहे वैयक्तिक शौचालय.
१.१९ लाख कुटुंबांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.