आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आॅर्किडच्या २८ जणांनी २७ दिवसांत बनवली २५० सीसीची बाईक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - नागेशकर जगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाने क्वाड बाईक बनवली आहे. या बाइकचे डिझाईन तयार करण्यासाठी तीन महिने तर प्रत्यक्ष बनवण्यासाठी २८ जणांच्या टीमला २७ दिवसांचा कलावधी लागला आहे. कोईमतूर येथे होणाऱ्या ‘क्वाॅड बाईक डिझाईन चॅलेंज’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी ही बाईक तयार केली आहे. बुधवारी (दि. १९) बाईक कोईमतूरला रवाना केली जाईल, अशी माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी दिली. कोईमतूर येथे २१ ते २५ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
ही संपूर्ण बाईक ऑर्किड अभियांत्रिकीच्या कार्यशाळेत बनवली आहे. इंटीग्रेटेड गिअर बॉक्स विथ डिफरंशिअल हा पार्ट महत्त्वाचा असून तो विद्यार्थ्यांनी बनवला आहे. ही बाईक बनवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. कोइमतूर येथील स्पर्धेत भारत बांगलादेशमधून २८ स्पर्धक महाविद्यालये सहभागी होतील. महाराष्ट्रातून दोन टीम सहभागी होतील. त्यामध्ये सोलापूर आणि पुण्याचा समावेश आहे. या टीमध्ये दोन मुलींचाही समावेश आहे.

प्रा. डाॅ. एस. एस. मेतन, प्रा. एन. आर. पाटील, प्रा. ए. बी.मगर, प्रा. एस. एस. काळे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. ही बाईक बनवण्यासाठी भवानी मोटर्स, राजमुद्रा डोअर्स, ढंगे फर्निचर, एस. एस. आयकाॅन डेव्हलपर्स, कायझन होंडा, गीतांजली पेंटस, इथॉस डेव्हलपर्स यांनी सहकार्य केले.

ही आहे २८ जणांची टीम
किरणकुमार गजभार, पीयूष खुबा, बाळकृष्ण पासकंटी, दीपक कैंची, तपन मंगलपल्ली, श्रीराज पाटील, प्रथमेश अंदेली, सागर चिमन, स्वप्नील माने, अाशिष चांदणे, आशिष कसेकर, अशोक दसाडे, सुरभी माळवदकर, अजय काळे, अमित बावटनकर, हबीब सय्यद, समीर पिंजार, तल्हा येलाल, सालिक बिजापुरे, प्रतीक सुतार, श्रीनाथ धरणे, श्रेयस माळवदकर, सागर सोमवंशी, चंद्रशेखर बिराजदार, हर्षल कुलकर्णी, केदार काजळे, अनिरुद्ध गोसावी, वर्षा रजपूत.

हजार किलाे वजन ओढण्याची आहे क्षमता
चिखल आणि कच्च्या रस्त्यावरही चालू शकेल, अशी ही बाईक आहे. या गाडीचे नाव हायनो रेसर्स असे ठेवले आले. टीममधील प्रत्येक विद्यार्थी दिवस अन् रात्र बाईक तयार करण्यासाठी झटत होता. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे हजार किलो वजन ही बाईक सहजरीत्या वाहून नेऊ शकते. बाईकला २५० सीसी आणि २६ बीएचपी पॉवरचे इंजिन आहे. त्यामुळे गाडीचे वजन २७० किलो आहे. या बाईकचा कमाल वेग ताशी ६० किलोमीटर आहे.

^बाईक बनवण्यासाठीप्रत्येक विद्यार्थ्याने मेहनत घेतली आहे. प्राचार्य प्राध्यापक यांनीही मोलाचे सहकार्य केले. बाईक बनवण्यासाठी देणगीदार मिळवून अार्थिक बाजू सांभाळण्याचे काम केले. काही देणगीदारांनी गाडीसाठी तांत्रिक पार्टदेखील दिले. ही बाईक कोणत्याही अडथळ्यातून चालणारी आहे. प्रथमेश अंदेली, विद्यार्थी

^बाईक बनवताना वेगळाच अनुभव मिळाला आहे. अगोदर रोबोकॉनमध्ये सहभाग होता. हा दुसरा प्राेजेक्ट आहे. त्यामुळे औद्योगिक कारखान्यामध्ये प्रत्यक्ष काम करताना येणारा अनुभव महाविद्यालयातच मिळाला आहे. या स्पर्धेत बक्षीस मिळवणार आहोत. वर्षा रजपूत, विद्यार्थिनी

बातम्या आणखी आहेत...