आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५० इको फ्रेंडली मूर्तीचे घरात विसर्जन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात जवळपास अडीचशे जणांनी इको फ्रेंडली (शाडू आणि मातीच्या) गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. रविवारी त्यांचे घरात विसर्जन करण्यात आले. यात सहा शाळांचा सहभाग होता. महापालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेश मूर्ती तलावात विसर्जन करता दान करण्याचे आवाहन केले होते. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे २०० घरगुती चार मोठ्या मंडळांनी मूर्ती दान केल्या. या मूर्तीचे अन्यत्र विसर्जन करण्यात येणार आहे.

पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. शिवाय त्यांच्यावरील रासायनिक रंगांमुळे जलाशयातील जलचरांवर परिणाम होतो. हे जलप्रदूषण रोखण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची हाक दिली होती. त्याला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक शाळांमधून मुलांना मातीपासून मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आल होतेे. विसर्जनही घरीच करुन पाणी परसातील रोपांना देण्यात आले.

या शाळांचा सहभाग
दैनिक दिव्य मराठीच्या आवाहनानुसार घरात गणपती मूर्तीचे विसर्जन करणाऱ्या या गणेश भक्तांनी माहिती पाठवली.
मनपा शाळा क्र. दोन (तुळजापूर वेस),क्र. तीन (वैदू वस्ती), क्र. पाच (कुमठा नाका), सिद्धेश्वर प्रशाला (सिद्धेश्वर पेठ), ज्ञानप्रबोधिनी (डफरीन चौक), मेहता प्रशाला (जुळे सोलापूर)
यांनी केले गणेश मूर्तीचे घरात विसर्जन
प्रा.श्रीकांत जहागिरदार (नेताजी सुभाष नगर,)
डॉ. साईनाथ शालजेवार (नवीन आरटीओ जवळ)
रत्नाकर गम (आर्यनंदी नगर)
शशिकांत पानसरे (म्हाडा कॉलनी जुळे सोलापूर),
संजय भोईटे (राजस्व नगर, सोलापूर)
माधवी नामदेव घोडके (ओमगर्जना चौक, सैफुल)

महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद
सिद्धेश्वरतलाव येथील गणपती घाट विसर्जन ठिकाणी महापालिकेने व्यासपीठ उभारले. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती तलावात विसर्जन करता दान करावी असे आवाहन केले. त्याची घेत दखल २०० घरगुती तर चार मोठ्या मंडळांकडून मूर्ती दान करण्यात आल्या. या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.