आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11: सुलतानपुरचे शहीद राहुलनगर करण्याचा फेरदुरुस्तीचा प्रस्ताव माढा लाल फितीत अडकला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा (सोलापूर)- 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान राहुल सुभाष शिंदे यांच्या बलिदानाचे स्मरण चिरंतन राहण्यासाठी सुलतानपूर (ता. माढा) या गावाचे नाव राहुलनगर करण्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया धिम्यागतीने सुरु आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे देऊनही या हालचाली गेल्या नऊ वर्षांपासुन फक्त कागदावरच आहेत. हा प्रस्ताव शासनाच्या लालफितीच्या कारभारात अडकला आहे.

 

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात राहुल शिंदे हे शहीद झाले होते. गावाचे नामांतर करण्याबाबतची आवश्यक सर्व कागदपत्राचा प्रस्ताव सुलतानपूर   ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी  प्रशासनाकडे पाठवला आहे. शहीद झालेल्या जवानांच्या नावाने गावाचे नामांतर होण्याच्या प्रक्रियेस नऊ वर्षाचा विलंब लागुनही शासन दरबारी ही प्रक्रिया अपुरीच राहिली आहे. विशेष म्हणजे या गावाचे  नामांतर करण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयात 2010 सालापासुन धुळखात पडला आहे. या विभागातून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जातो. सामान्य प्रशासनातुन या प्रस्तावाला 2017 मध्ये हात लागला आहे. गावाच्या नामांतर प्रस्तावाला लागणाऱ्या पाच कागदपत्राच्या फेरमागणीचा प्रस्ताव सामान्य प्रशासनाकडुन विभागीय आयुक्त यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव 5 ऑक्टोबर 2017 ला माढा तहसिलला पाठवला आहे. मात्र माढा  तहसील कार्यालयातुन हा प्रस्ताव अद्याप सुलतानपूर ग्रामपंचायतीकडे गेलेला नाही. याबाबत सुलतानचे ग्रामस्थ माढा तहसिल मध्ये हेलपाटे मारत आहेत. मात्र याने क्लार्क गैरहजर असल्याचे कारण सांगितले जात आहे. ही प्रकिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देऊनही प्रशासनाला नऊ वर्षाचा कसा काय कालावधी लागतो हाच खरा प्रश्न उपस्थित होत असून शहिंदाच्या प्रती शासन व प्रशासन  उदासिन असल्याचे यावरुन स्पष्ट दिसुन येते.

 

याबाबत माढाचे तहसिलदार सदाशिव पडदुणे म्हणाले की, याबाबतची मी माहिती घेऊन हा प्रस्ताव ग्रामपंचायत सुलतानपुरला पाठविण्यात यावा अशा सूचना देतो. तर शहीद राहुल शिंदेंचे वडील सुभाष शिंदे म्हणाले की, मी सर्व कागदपत्रे गोळा करुन गावातील ग्रामस्थांसह गावाच्या नामांतरासाठी पाठपुरावा करीत आलो आहे .मात्र प्रशासनाकडुन हालचाली संथ गतीने सुरु आहेत. पालकमंत्री व सहकारमंत्री यांनी यात लक्ष द्यावे.

 

सुलतानपूरचे सरपंच सुनिल शिंदे म्हणाले, ग्रामपंचायतीचा ठराव व इतर सर्व माहिती आम्ही देत आलो आहोत.आणखी काही आवश्यकता लाभल्यास  ती ही पुर्ण  करू. शहीद राहुल शिंदे बहुउद्वेशीय सामजिक संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसिल कार्यालय, माढा यांच्याकडून फेरदुरुस्तीचा अहवाल माहितीसाठी मागविला आहे. हा प्रस्ताव अद्याप आम्हाला दिलेला नाही. आठ वेळा तहसिलमध्ये जाऊन आलो मात्र टेबलचा अधिकारी गैरहजर असल्याचे कारण दिले जात आहे. प्रशासन याबाबत उदासिन आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडिओ

बातम्या आणखी आहेत...