आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कळंबमध्ये लाठीहल्ल्याचा निषेध, २७१ शाळांची वाजली नाही घंटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - औरंगाबादेत विनाअनुदानित शिक्षकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात शिक्षक जखमी झाले असून, तरीही पोलिसांनी शिक्षकांवरच गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे शिक्षकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षणसंस्थाचालकांनी गुरुवारी बंद पाळला तसेच शिक्षकांनी काळ्या फिती लावून काळा दिवस पाळला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील खासगी तत्वावरील माध्यमिक आणि प्राथमिक २७१ शाळा कडकडीत बंद होत्या.
शिक्षकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी शिक्षण संस्थाचालक संघटनेच्या वतीने शाळा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शाळा बंद ठेवण्यासंदर्भात शिक्षण संस्थाचालक संघटनांनी बुधवारीच आवाहन केले होते. गुरुवारी संघटनेच्या आवाहनानुसार जवळपास सर्वच खासगी शाळा बंद ठेवण्यात अाल्या. पूर्वकल्पना नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाऊन परतावे लागले. दरम्यान, शिक्षण संस्थाचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून, त्यामध्ये म्हटले आहे की, ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढण्यात आल्यानंतर पोलिसांनी विनाअनुदानित शिक्षकांवर अमानुष लाठीहल्ला केला. यामध्ये अनेक शिक्षक, शिक्षिका जखमी झाल्या आहेत. १७ वर्षांपासून उपाशीपोटी विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांनी अनुदान मिळावे, या मागणीसाठी मोर्चा काढला होता. काँक्रिटच्या रस्त्यावर दगड नसताना शिक्षकांनी दगडफेक केल्याचा खोटा आरोप करून ५९ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५९ शिक्षकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी आंदोलन केले आहे. निवेदनावर एम. डी. देशमुख, व्ही.जी.पवार, एस. के. आबदरे, बालाजी तांबे, राजकुमार मेंढेकर, संजय कांबळे, एल. आर. एडके, बालाजी इतबारे, अशोकराव पवार, एस. एस. मस्के, लहुराज लोमटे, जे.डी.माळी, पी. बी. खरमाटे, एस. एम. मनसुके आदींच्या स्वाक्षरी आहेत.
शिक्षक संघटना, संस्थाचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या आहेत संघटनेच्या मागण्या
{१९ सप्टेंबर २०१६ चा विनाअनुदानित शाळेसंदर्भातील शासन अध्यादेश रद्द करून अनुदानास पात्र घोषित अघोषित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे
{मूल्यांकन पात्र उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांना त्वरित अनुदान द्यावे
{विनाअनुदान शाळांना अनुदान शाळांच्या सर्व अटी शर्ती लागू कराव्यात
{इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मान्यता देऊ नये
{२०१६-१७ च्या संचमान्यतेनुसार शिक्षकांना अतिरिक्त करू नये

पाळण्यात आलेल्या बंदमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सहभाग नव्हता. त्यामुळे काही शाळा सुरू तर काही बंद, अशी स्थिती होती. जिल्ह्यात खासगी तत्वावरील माध्यमिकच्या ३६३ तर प्राथमिकच्या ९७ शाळा असून, त्यापैकी माध्यमिकच्या २०६ तर प्राथमिकच्या ६५ शाळांनी बंदमध्ये सहभाग घेतला. म्हणजे जवळपास ६० टक्के शाळांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला. आंदोलनादरम्यान इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू असतात. चालू शैक्षणिक सत्रात तीनवेळा शाळा बंद आंदोलन झाले. मात्र, त्यात एकदाही इंग्रजी शाळांनी सहभाग घेतला नाही.
बातम्या आणखी आहेत...