आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याचा २७९ कोटींचा आराखडा, जिल्हा नियोजन समितीची सोमवारी बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा नियोजन समितीची चालू वर्षातील अंतिम बैठक सोमवारी (दि. २५ जानेवारी) होत आहे. मागील वर्षी २६३ कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी दिला होता. यामध्ये राज्यस्तरीय समितीने ४८ कोटी रुपयांची वाढ करत ३११ कोटी रुपयांस अंतिम मंजुरी दिली होती. यामध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी खर्च केलेल्या ४६ कोटींचा समावेश आहे. २०१६-१७ साठी २७९ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला अाहे. याला सोमवारी होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी घेण्यात येणार आहे.

डिसेंबरअखेर१६६ कोटी रुपये खर्च : २०१५-१६या वर्षातील डिसेंबर २०१५ अखेरपर्यंत ३११ कोटींपैकी १६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत ३११ कोटी रुपयांपैकी विविध विभागांना २४६ कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. यापैकी ४६ कोटी रुपये जलयुक्त शिवार अभियानासाठी तर ११ कोटी २५ लाख नाविन्यपूर्ण योजनेसाठी देण्यात आले आहेत. अद्याप ७५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला नाही.

दुष्काळ, शहराच्या पाणीप्रश्नी चर्चा
उजनी धरणातून शहराला पाणी सोडण्याची मागणी केली असली तरी २२.५ कोटी रुपये थकबाकी भरण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना विभागीय आयुक्तांनी केली आहे. या प्रश्नावर महापालिका सदस्य आमदार जाब विचारण्याची शक्यता आहे. शिवाय जिल्ह्यात पाणीटंचाई असल्याने टँकर मंजुरीच्या प्रश्नावरही लोकप्रतिनिधी अध्यक्षांना मागील बैठकीप्रमाणेच घेरण्याची शक्यता आहे.