आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर्षणामुळे कंटेनरला आग, २८ दुचाकी जळाल्या- जुना बोरामणी नाका चौकात घडली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगावहून- तामिळनाडूकडे कंटेनरमधून होंडा कंपनीच्या दुचाकी घेऊन जाताना घर्षणामुळे अाग लागल्यामुळे २८ गाड्या जळाल्या अाहेत. ही घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमाराला जुना बोरामणी नाका चौकात घडली. अग्निशामक दलाच्या पथकाने तीन गाड्या पाणी फोमचा वापर करून अाग अाटोक्यात अाणली.

कंटनेरमध्ये दोन कप्पे असून प्रत्येक कप्यात २८ गाड्या होत्या. वरच्या कप्यातून धूर येत असल्याचे नागरिकांनी चालकाला सांगितले. गाडी थांबवून अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर पाण्याचा फवारा करून अाग अाटोक्यात अाणली.
गाड्यांचे सीटकव्हर, फायबर बाॅडी, ट्यूबटायर रबर असल्यामुळे अाग भडकत होती. फोमचा फवारा करून अाटोक्यात अाणली. खालच्या कप्प्यातील दोन गाड्यांना फक्त झळ पोहोचली अाहे. घटनास्थळाजवळच पेट्रोल पंपही होता.

अग्निशामक दलामुळे आग आटोक्यात
अग्निशामक दलाच्या पथकाने तत्परता दाखवून अाटोक्यात अाणल्यामुळे पुढील अनर्थ टळला. जोडभावी पोलिसात या घटनेची नोंद करण्यात अाली अाहे. याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख केदार अावटे यांना विचारले असता, अाग कशामुळे लागली हेही अजून समोर अाले नाही. उन्हामुळे अथवा वाहनांचा घर्षणामुळे अाग लागल्याचा संशय अाहे. अठ्ठावीस गाड्यांचे नुकसान झाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...