आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ३.७७ कोटी निधी बहुमताने मंजूर,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अशोक चौक परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होत आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ३.७७ कोटींच्या निधीस शनिवारी बहुमताने मान्यता देण्यात आली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी अंदाजपत्रकात कोटींची तरतूद केली होती.
दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ३.७७ कोटी निधीची गरज होती. महापौर बंगला आणि नगर अभियंता कार्यालयासाठी असलेल्या चार कोटीपैकी ३.७७ कोटी रुपये वर्ग करण्याची सूचना काँग्रेसने मांडली. त्याबराेबर पंतप्रधान आवास योजनेसाठी मनपा हिश्श्यापोटी २५ कोटी निधीची मनपा बजेटमध्ये तरतूद आहे. त्यातील दहा कोटी निधी रस्त्याच्या कामासाठी वर्ग करण्याची शिफारस काँग्रेसने सूचनेत मांडली. त्यास युतीने विरोध केला.

दहा कोटी निधी वर्ग करण्याचा विषय स्वतंत्र आणा. स्मारकाच्या विषयात इतर निधी वळवू नका, अशी भूमिका विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, शिवसेनेचे नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे यांनी मांडली. मनपा बजेट देत असताना इतर कामासाठी निधी आवश्यक असल्याने विषय आणल्याचे सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी सांगितले. चर्चेअंती बहुमताने विषयास मान्यता दिली.
बातम्या आणखी आहेत...