आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक बसमधून तोळे दागिने महिला चोरांनी पळवले, शहरात आणखी दोन ठिकाणी चो-या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विजापूरहून सोलापूरकडे बसमधून (केए २६ एफ ९३८) येताना पिशवीत ठेवलेले नऊ तोळे सोन्याचे दागिने १५ तोळे चांदीचे दागिने महिला चोरांनी पळविले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. मोहम्मद अासिफ शेख (रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी, विजापूर रोड, सोलापूर ) यांनी विजापूर नाका पोलिसात तक्रार दिली अाहे. 
 
शेख हे खासगी कंपनीत काम करतात. त्यांची सासूरवाडी विजापूरला अाहे. पत्नीसह ते गावी गेले होते. परत काल रात्री बसमधून येत होते. त्यांच्या मागील सीटवर तीन-चार महिला बसल्या होत्या. नऊ तोळे दागिने पिशवीत ठेवले होते. दागिन्यांची पिशवी कधी काढून घेण्यात अाली ते कळलेच नाही. जुना विजापूर नाका येथे बसमधून उतरल्यानंतर लक्षात अाल्यानंतर पिशवीत दागिने नव्हते. विजापूर नाका पोलिसात तक्रार देण्यात अाली अाहे. सोन्याचे लाॅकेट, चपलाहार, नेकलेस, अंगठ्या, कानातील फुले, नथ असे नऊ तोळे दागिने होते. १५ तोळे चांदीचे पैंजण होते. 
 
नवीपेठेत दागिने पळवले : नवीपेठेतीलअायाशा गारमेंट दुकानासमोर गर्दीचा फायदा घेत रेहाना जमील शेख (रा. रविवारपेठ, सोलापूर) यांच्या पर्समधून १५ हजार किमतीचे दागिने पळवले. ही घटना शुक्रवारी घडली. फौजदार चावडी पोलिसात तक्रार देण्यात अाली अाहे. पिशवीत पर्समध्ये दागिने ठेवले होते. लकीचौकात कारमधून लॅपटाॅप पळवला : लकीचौकातील कुकरेजा स्पोर्ट दुकानासमोर कारमधून लॅपटाॅप पासपोर्ट चोरांनी पळविला. खाली पैसे पडले अाहेत असे सांगून बॅग पळविण्यात अाली. कामन्ना गुरूपादप्पा व्हनसुरे (रा. हराळेनगर, होटगी रोड, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली अाहे. चोरीस गेलेल्या साहित्याची किंमत ७३ हजार रुपये अाहे. व्हनसूरे हे कारमध्ये बसले होते. दोघे तरुण अाले, अापले पैसे पडले अाहेत, असे सांगितले. पैसे घेण्यासाठी कारमधून बाहेर अाल्यानंतर कारमधील लॅपटाॅपची बॅग चोरांनी पळविली. अशीच घटना शुक्रवारी नवल पेट्रोल पंपासमोर घडली होती. सलग ही दुसरी घटना घडली अाहे. 
 
तरुणावर ब्लेडने वार 
एमअायडीसीभागातील कामगार वसाहतीजवळून पायी जाताना श्रीकांत गंगा (वय २२ , रा. कलावतीनगर) याच्या गालावर तरुणाने ब्लेडने वार केला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. संशयित तरुणाचे नाव पापा असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारणही समोर अाले नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...