आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे जिल्ह्यातून सोडणार तीन टीएमसी, पोचणार दीड टीएमसी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पुण्यातील चासकमान भामा-आसखेड धरणातून उजनी धरणामध्ये तीन टीएमसी (हजार दशलक्ष घनफूट) पाणी सोडण्याचा आदेश जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला.
उजनी धरणात पावसाळ्यात ६० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा झाल्यावर पुण्यातील धरणातून पाणी सोडण्याची सूचनाही प्राधिकरणाने केली अाहे. तीन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय दिला असला तरी प्रत्यक्षात उजनी धरणामध्ये दीड टीएमसी पाणी पोहचणार आहे. शिवाय २६० कि.मी. चे अंतर कापण्यास १२ ते १४ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी पुण्यातील धरणांतून उजनीत पाणी सोडण्यासंबंधी प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. यावर निकाल देताना पुण्यातील चासकमान, भामा-आसखेड, मुळशी आंद्र धरणातून दहा टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश प्राधिकरणाने दिला होता. या आदेशावर खेड शिरूरच्या आमदारांनी आक्षेप घेतला. हा निर्णय उच्च न्यायालयात गेला, यावर न्यायालयाने पुनर्निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तीन टीएमसी पाणी सोडण्याचे प्राधिकरणाने आदेश दिले. यामध्ये चासकमान धरणातून पाऊण टीएमसी तर भामा आसखेडमधून सव्वा दोन टीएमसी पाणी सोडावे, असे प्राधिकरणचे अध्यक्ष रवी बुद्धिराजा सदस्या चित्कला झुत्शी यांनी स्पष्ट केले आहे.

शहराची पिण्याच्या पाण्यासाठी आणि जिल्ह्याची सिंचनासाठी उजनी जलाशयावरच भिस्त आहे. यंदा पुणे जिल्हा परिसरात खूप कमी पाऊस झाल्याने उजनी धरणे पूर्ण भरणे तर सोडाच समाधानकारकही भरले नाही. त्यामुळे पावसाळ्यातही साठा उणे पातळीत होता.
दुकानदाराचा खुलासा असमाधानकारक
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून ही कारवाई करण्यात आली आहे. तपासणीमध्ये अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या होत्या. याबाबत दुकानदाराचा खुलासा असमाधानकारक वाटल्याने ही कारवाई करण्यात आली. रमेशचव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी
यापूर्वीचा निर्णय
पुणे जिल्ह्यातील भामा-आसखेड, चासकमान, मुळशी, कासारसाई, आंध्रा वडीवळे या धरणातून उजनी धरणामध्ये १०.३० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय १६ ऑक्टोबर रोजी घेतला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राधिकरणाने भामा-आसखेड चासकमान या दोन धरणातून फक्त तीन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय दिला आहे.

धरणात साठा वाढल्यास शेतीला पाणी मिळणे शक्य
जलसंपत्तीप्राधिकरणाने धरणातील उपयुक्त पाणीपातळी वजा असल्यास शेतीसाठी पाणी सोडू नये, असे आदेश आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील तीन टीएमसी पाणी सोडूनही शेतीसाठी पाणी मिळणे कठीणच आहे. शिवाय हे पुणे जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडल्यास २६० कि.मी.चे अंतर पार करण्यास १२ ते १४ दिवसांचा कालावधी लागणार आहे.