आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसरा ते विजापूर रस्ता ३० मीटर रुंदीचा प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आसराचौक, आसरा रेल्वे पूल, डी मार्ट येथे होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी आसरा चौक ते बनशंकरी नगऱ- विजापूर रोडपर्यंत ३० मीटर रुंदीचा सुमारे दोन ते अडीच किमी रस्ता होणार आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी या प्रकल्पासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्याचे मान्य केले. महापालिकेतर्फे रस्त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी होणाऱ्या मनपा स्थायी समितीसमोर हा विषय चर्चेसाठी येणार आहे.

सातमीटरचा मक्ता निश्चित
तज्ज्ञसल्लागार एनव्हायरोसेफ कंन्सल्टंट यांच्याकडून प्रकल्प किमतीच्या ०.९० टक्के दराने आराखडा तयार करून घेण्यात येणार आहे. सध्या नगरोत्थान योजनेअंतर्गत आसरा पूल ते विजापूर रोडपर्यंत सात मीटर रुंदीच्या २.५ किमी रस्त्यासाठी २.५ कोटी निधी मंजूर आहे.या कामासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी निधी मंजूर केला आहे. त्याचे टेंडर काढून स्थायी समितीपुढे हा विषय आला होता. पण ते फेरसादर करण्याचे आदेश स्थायीने दिले. मंजुरी नसल्याने काम झाले नाही. या मार्गालाच ३० मीटर करण्याचा प्रयत्न आहे. आमदार सुभाष देशमुख मुख्यमंत्री कोट्यातून विशेष निधी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आगामी काळात हा माॅडेल रस्ता ठरेल.

>जुळे सोलापूर, मजरेवाडी, म्हाडा काॅलनी, सिंधू विहार, रूबी नगर, बँक आॅफ इंडिया वसाहत, लक्ष्मी बँक काॅलनी, मजरेवाडी, सहस्रार्जुन नगर, ज्ञानेश्वर नगर, बाॅम्बे पार्क, रोहिणी नगर, सिध्देश्वर नगर, भाग्योदय पार्क भागांना लाभ.
>पदपथ, रस्ता दुभाजक, मध्यभागी दिवाबत्ती, वृक्ष लागवड करणे अपेक्षित
>दोन लाख नागरिकांना होईल फायदा

२.५ किमी रस्त्याची लांबी
३० मीटर रस्त्याची रुंदी

रस्त्याचा मार्ग : आसराचौक ते जुळे सोलापूर पाण्याची टाकी ते टाकळीकर मंगल कार्यालय ते विजापूर राष्ट्रीय महामार्गापर्यंत
स्थायी समिती समोर अन्य विषय :{बोअर दुरुस्ती मक्ता िनश्चित करणे { फौजिया शेख नागराज मंजुळे यांना सन्मानपत्र देण्यासाठी १.८९ लाख रुपयांस मंजुरी {७० घंटागाड्या खरेदी आदी विषय चर्चेसाठी आहेत.
सात मीटरचा रस्ता व्हावा
*रस्ताखराब असल्याने तेथील नागरिकांचे हाल हाेत आहेत. आता मंजूर असलेला सात मीटर रुंदीचा रस्ता त्वरित होणे आवश्यक आहे. ३० मीटर रुंदीचा रस्ता मंजूर झाल्यावर तो करावा. माॅडेल रस्त्याच्या नावाने मंजूर रस्ता रद्द करण्यात येऊ नये. नरेंद्रकाळे, नगरसेवक
सातमीटर रस्ता करणार
*आसरापूल ते विजापूर राष्ट्रीय महामार्ग पर्यंत सात मीटर रुंदीचा रस्ता मंजूर असून, स्थायीत मंजुरी नाही. फेरसादर करण्याचे आदेश स्थायीने दिले. त्यानुसार सादर करून मंजुरीनंतर तो रस्ता करण्यात येईल. भविष्यकाळ पाहता माॅडेल रस्ता म्हणून आराखडा तयार करण्यात येत आहे. लक्ष्मणचलवादी, मनपा प्र. नगर अभियंता
बातम्या आणखी आहेत...