आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडी घरकुल परिसरातील तब्बल ३० जण तडीपार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गणेेशोत्सव काळात शहरात शांतता राहावी म्हणून विडी घरकुल आणि कुंभारी परिसरातील तीस जणांना द. सोलापूर तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले. तीस जणांना तडीपार करण्याची मोठी कारवाई प्रथमच करण्यात येत आहे.
कुंभारी, विडी घरकुल परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांना तडीपार करण्यात आले. यात राजू बुध्दप्पा कोळी, दिलीप काशिनाथ कटारे, राजेश सोमनाथ इमडे, सोमनाथ शंकर इमडे, विजय सोमनाथ इमडे, शंकर सत्यप्पा कोळी, जगन्नाथ अंबाजी कोंतम, मोहन लक्ष्मण शेरला, मुस्ताक अहमद सरोडगी, कैलास नारायण गंजी, दौलतबी सिंकदर शेख, महेश रामस्वामी बिज्जा, रघुनाथ भूमय्या लगशेट्टी, विशाल निवृत्ती मेरगु, अविनाश कृष्णहरी केरमकुंडा, शिवराज इरप्पा चिंचोळ, अनिल सोमसिंग राठोड, चाँद रमजान शेख, अंबादास भंडारी, अंबादास येरजर, प्रमिला चिलवेरी, पांडुरंग भंडारी, मनोहर नराल, अनिल चिंता, श्रीनिवास उडता, महादेव तेलंग आदीचा समावेश आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. एस. कापसे यांनी ही कारवाई केली. याशिवाय २० सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...