आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल ३०० दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- वाहतूकनियंत्रण शाखेच्या पोलिसांनी शहरात ३२० दुचाकीस्वारांवर कारवाई केली. त्यापैकी १२५ वाहनांना पुढील कारवाईसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हवाली करण्यात आले. इतर वाहनचालकांना दंड करून सोडून देण्यात आले.
मोबाइलवर बोलत जाणे, ट्रीपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, वाहन परवाना नाही अशा उणिवा असतील तर आपल्याला दंडात्मक कारवाईसाठी सामोरे जावे लागेल. सुमारे बारा ते चौदाशे रुपये दंड होऊन गाडी एक दिवस पोलिस ठाण्यात असते. दुसऱ्या दिवशी आरटीओत जाऊन कागदपत्रे दाखवून गाडी घेणे यात पूर्ण दिवस जातो. म्हणजे आपली गाडी एकदा पकडली की दोन दिवस अडकून पडेल. यासाठी सर्व कागदपत्रे जवळ बाळगून रस्त्यावर गाडी चालवा.

शुक्रवारी उत्तर दक्षिण विभाग वाहतूक शाखेकडून शहरात विविध ठिकाणी मोहीम राबवण्यात आली. यासाठी नेमण्यात आलेल्या चाळीस पोलिसांचे पथकाने गाडी पकडल्यानंतर ते पथक दुचाकी थेट वाहतूक शाखेत आणून लावत होते.

आम्ही गरीब कामगार, दंड कसा परवडणार?
गरीबपेंटर कामगार आहे. बाराशे-चौदाशे दंड कसा परवणार आहे? फॅन्सी नंबरमुळे गाडी पकडली. त्यापुरता दंड घ्या. दंड आणि दोन दिवस गाडी थांबवणे योग्य नाही, असे मत मल्लिकार्जुन शिवपुजे यांनी मांडले. नागेश रूपनर यांची दुचाकी मोबाइल टॉकिंग कलमाखाली पकडण्यात आली. मोबाइलवर फोन आल्याने मी गाडी थांबवून बाजूला खिशातून मोबाइल काढत होतो आणि पोलिसांनी पकडले. असे कसे काय?

नागरिकांनी कागदपत्रे जवळ ठेवावीत
नागरिकांनीवाहन परवाना, आरसीबुक, पीयूसी, विमा, शासकीय नियमानुसार नंबर प्लेट पाहिजे, मोबाइलवर बोलणे टाळावे. वाहतूक नियम पाळावेत असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील घार्गे यांनी केले आहे. ही मोहीम शनिवारी होणार आहे. आज १२५ वाहने पकडून आरटीओच्या ताब्यात दिल्याचे त्यांनी सांगितले.

कारवाई सर्वांवर करावी, त्यात भेद नको
दुचाकीवरकारवाई करता ठीक आहे. अपेरिक्षांमध्ये बारा प्रवासी असतात. विना पासिंग गाड्या आहेत. ड्रेसकोड नाही, बॅच बिल्ला नाही, अन्य कागदपत्रे नसतात. त्यांच्यावर का कारवाई होत नाही? रिक्षा कुठेही अचानक थांबतात, त्यांना शिस्त लावा. नो पार्किंग, झेब्रा पट्टे, वन-वे, सिग्नल सक्षमपणे सुरू ठेवा. चौकात कुणीही कसेही थांबतात. या घटनांवर अंकुश ठेवा. सर्वांना नियम समान लावा. तरच वाहतूक शिस्त येईल, असे मत वाहतूक शाखेत गाडी पकडल्यानंतर आलेल्या अनेक नागरिकांनी नाव छापण्याच्या अटीवर मांडले.