आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीला गेलेल्या 33 दुचाकी जप्त, सहा संशयित जेरबंद, दोघे अल्पवयीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पोलिसांनी सोमवारी सुमारे ३३ दुचाकी जप्त केल्या अाहेत. यात सहा जणांना अटक झाली असून दोघेजण अल्पवयीन अाहेत. ज्या नागरिकांची दुचाकी चोरीला गेली अाहे त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन पाहणी करावी, असे अावाहन पोलिसांनी केले अाहे. 

सदर बझार पोलिसांनी शरद कुमार घोडके (वय ३४, रा. लोकसेवा हायस्कूलजवळ, सोलापूर) याला अटक केली अाहे. त्याच्याकडे १७ दुचाकी सापडल्या अाहेत. घोडकेचा साथीदार रवी बाबासाहेब उबाळे (वय ३२, रा. काटीसावरगाव, तुळजापूर) यालाही अटक अाहे. जेल रोड पोलिसांनी अनिल रामपुरे (वय २२, रा. सिद्धेश्वरनगर भाग एक, स्वागतनगर) याला अटक केली अाहे. त्याला मार्केट यार्डजवळ ताब्यात घेण्यात अाले. मागील अाठ महिन्यांपासून ११ दुचाकी चोरी केल्याचे समोर अाले अाहे. त्याच्याकडून बारा दुचाकी जप्त केल्या अाहेत. 

फौजदार चावडी पोलिसांनी मोबीन अब्दुल रजाक (वय ३०, रा. काडादी चाळ, सिद्धेश्वर पेठ) याला अटक केली अाहे. त्याचे अाणखी दोन अल्पवयीन साथीदार अाहेत. जप्त केलेल्या दुचाकीत बुलेट, शाईन, अॅक्टिव्हा, स्प्लेंडर अशा विविध प्रकारच्या ३३ दुचाकी अाहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय जगताप, संतोष काणे, श्री. सय्यद, डीबी पथकाचे फौजदार श्री. हंचाटे, सचिन बनकर, शैलेश खेडकर त्यांच्या पथकाने केली. दुचाकी चोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल का याची चाचपणी सुरू असल्याची माहिती उपायुक्त अपर्णा गीते यांनी दिली. पोलिस अायुक्त महादेव तांबडे यांनी तपास पथकाचे अभिनंदन करीत रिवाॅर्ड देण्यात येणार असल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...