आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३५ मिळकती सील, दीड कोटीची वसुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार घेताच, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी वसुलीची मोहीम सुरू केली. सोमवारी एक कोटी तर मंगळवारी दीड कोटी असे दोन दिवसांत अडीच कोटींची वसुली केली. मंगळवारी शहरातील १८ तर हद्दवाढ भागातील १७ अशा ३५ मिळकती सील केल्या. महापालिकेत उशिरा येणाऱ्या ९३ जणांवर कारवाई प्रस्तावित आहे.
फौजदारी दाखल करा
तहसीलकार्यालय परिसरापेक्षा अधिक क्षेत्रावर मंडप उभारल्याचे दाखवून बिले लावणे. निवडणूक कालावधीत २४ तास जनरेटर वापरल्याचे बिल लावणे हा फसवणुकीचा प्रकार अाहे. मी पंतप्रधान कार्यालयाकडे ३३ जिल्ह्यांच्या चौकशीची तक्रार केली अाहे. तुळजापूरच्या मक्तेदाराला मक्ता कसा दिला, या प्रकाराची चौकशी होण्यासाठी फौजदारी खटला दाखल व्हायला हवा. विठ्ठल अभंगराव, तक्रारदार
आजपासून लिलावाच्या नोटीस देण्यात येणार
दोनदिवस थकीत मिळकतदारांवर महापालिकेने कारवाई केली. बुधवारपासून लिलावाची नोटीस देण्यात येणार आहे. याशिवाय २५ ते ५० हजार पर्यंत मिळकतदारांना नोटीस देण्यात येणार आहे.
खादी ग्रामोद्योगसह दवाखाना सील
शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामोद्योगसह, सोशल काॅलेज, शरदचंद्र पवार प्रशाला येथील काही खोल्या असे सुमारे १८ मिळकती सील केल्या. ७०.२ लाखांची रक्कम वसूल केली.
वल्याळ डेंटलसह १८ मिळकती केल्या सील
हद्दवाढ भागातील केगाव येथील वल्याळ दंत महाविद्यालय, महात्मा फुले सभागृह कुमठे, परळे केमिकलसह १७ मिळकती सील केल्या. या भागातून ६७.३६ लाख रुपये वसूल झाले.
महापालिकेत तणाव
महापालिकेतमंगळवारी सकाळी सर्व विभागातील हजेरी पुस्तक आयुक्त कार्यालयात मागवण्यात आले. वसुलीसाठी कर्मचारी दिवसभर शहरात फिरत होते. सर्व प्रकार पाहता महापालिकेत तणावाची स्थिती होती.