आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद जिल्ह्यातील 3500 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
उस्मानाबाद - जिल्ह्यातील साडेतीन हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केल्यामुळे मागील महिन्यांपासूनचे विविध अहवाल खोळंबले आहेत. यामुळे योजनांच्या अंमलबजावणीसाठी महिला बालकल्याण विकास विभागाला अडथळे येत आहेत. मानधन वाढीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाने प्रशासनाची गोची झाली असून तोडगा निघाल्यास पुढील आठवड्यापासून अंगणवाड्या बंद करण्यात येणार आहेत. 
 
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्यापासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. दर महिन्याला बालकांच्या सर्वांगिन प्रगतीबाबत अहवाल सादर करण्यात येत असतात. यासाठी दर महिन्याच्या २५ तारखेपर्यंत जिल्ह्यातील सर्व ठिकाणाहून अहवालांचे संकलन केले जाते. मात्र, गेल्या महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी असहकार अांदोलन सुरू केले आहे. राज्यभर असलेल्या या आंदोलनाला जिल्ह्यातील पूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये शहरी ग्रामीण भागातील सुमारे ३५०० कर्मचारी सहभागी झाले आहेत. शून्य ते सहा वयोगटातील बालकांची प्रत्येक महिन्याला घेण्यात आलेली वजने, त्यांच्या डोक्यांच्या घेर, उंची यासंदर्भात दर महिन्याला अहवाल तयार करण्यात येत असतो. मात्र, असा अहवाल या महिन्यात सादर करण्यात आलेला नाही. तसेच बालकांना देण्यात आलेला पोषण आहार, गरोदर महिला स्तनदा मातांची आरोग्य तपासणी याच्याही अहवालांना ब्रेक लागला आहे. यामुळे उपाययोजना करण्यासाठी आगामी काळात अडथळे निर्माण होऊ शकतात. याचा बालक महिलांच्या आरोग्यावर दुरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. 
 
आधार लिंकिंग खोळंबले : बालकांचे आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया अंगणवाडींच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परंतु या आंदोलनामुळे या उपक्रमालाही ब्रेक लागला आहे. 
 
मागण्या मान्य झाल्यास बेमुदत बंद 
सध्या अहवाल लेखनावर बहिष्कार टाकला असून मागण्या मान्य झाल्यास ११ सप्टेंबरपासून बंदचे आंदोलन करणार आहोत.जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे बालकांची गैरसोय होणार असून शासनाने प्रश्नावर अगोदरच मार्ग काढण्याची मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. 
 
माघार नाही 
- शासनाने मानधन वाढीसाठी अनेक वेळा आश्वासने दिली आहेत. मात्र, यावर काहीच अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यामुळे आता मानधन दिल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही.
-भगवानदेशमुख, अध्यक्ष, अंगणवाडी सेविका महासंघ. 
 
सोमवारी मोर्चा : अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघ सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढणार आहे. दुपारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपासून मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...