आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४.५ लाख ट्रॅव्हल्सने पाठवले, मुंबईतील एसीपीची फसवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुंबईतील सहाय्यक पोलिस अायुक्त फुलसिंग पवार यांनी त्यांचे बंधू माजी नगरसेवक तथा निवृ्त प्राध्यापक भोजराज पवार यांच्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या चालक क्लिनरकडे पाठवलेले चार लाख ४० हजार रुपये हडप केल्याचा गुन्हा फौजदार चावडी पोलिसात दाखल करण्यात आला आहे. प्रा. पवार (रा. प्रताप नगर तांडा) यांनी फिर्याद दिली अाहे. बसचालक अनंत श्रीराम नळे, क्लिनर बसवराज सीताराम पवार (रा, बाळे) या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली अाहे.

पवार यांना एसीपी फुलसिंग पवार यांनी तीन जानेवारी रोजी घर बांधण्यास, नातीच्या बारशाचा कार्यक्रम शेतातील कामासाठी सिद्धनाथ ट्रॅव्हल्सचा चालक नळे याच्याकडे पैसे पाठवून दिले. पवार परिवाराचा तो अोळखीचा असल्याने अनेकदा पैसे अन्य साहित्य देतात. पवार त्यांचा मुलगा हे पैसे घेण्यास जुना पुणे नाका येथे बस अाल्यानंतर जाऊन चालकाला भेटले. पैशाची पिशवी घेतली. त्यात पैसे ठेवलेली बॅग नव्हती. चालक नळे क्लिनर पवार इरफान यांच्याविरुद्ध पैशाचा अपहार केल्याची फिर्याद दिल्यानंतर कारवाई झाली.

ठळक मुद्दे....
>खासगी बसमधून साडेचार लाख कसे पाठवले.
>असे रोखीने पैसे व्यवहार कायदेशीर अाहे का?
>खरा प्रकार उजेडात अाणण्याचे पोलिसांसमोर आव्हान.